संघ मुख्यालयावर वंचित अन् भारत मुक्तीचा मोर्चा; परवानगी नाकारली, काँग्रेसचा निर्धार कायम…
हर्षवर्धन सपकाळ केंद्र आणि राज्यात गृह खाबस्स सत्य मांडताना ते चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतो. मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आमचं म्हणणे मांडतोय. कोणताही हिंसाचार आम्ही करणार नाही. तरीही परवानगी नाकारली तरी आमचा मोर्चा निघणार. देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसावर दबाव आहे. खरात प्रकरण होऊ कसे दिलेत्यामुळे? मागील पाच वर्षाच्या काळात आपण गृहमंत्री होता. त्यावेळी तुम्ही झोपा काढत होता का? असा अस्वस्थ प्रश्न करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
एपस्टीन फाईल्स (Epstein files) प्रकरणात आज नागपूरच्या संघ मुख्यालयावर निघणाऱ्या वंचित बहुजन आघाडी व भारत मुक्ती मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलीहे. वंचित बहुजन आघाडी व भारत मुक्ती मोर्च्याकडून संविधान चौक ते संघ मुख्यालय या दरम्यान मोर्च्याची परवानगी मागण्यात आली होती. कायदा सुव्यवस्थेचे कारण देत संघ मुख्यालयावर मोर्च्या काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. या मोर्च्याला काँग्रेसचे पण समर्थन असून हर्षवर्धन सपकाळ हे देखील या मोर्च्यात सहभागी होणार आहे. फक्त संविधान चौकापुरता निषेध मोर्च्या करायचा असेल तर पोलीस अटीशर्तीवर परवनगी द्यायला तयार आहे. वंचित व भारत मुक्ती मोर्चा यांचा आरोप आहे कि भारताशी संबंधित एपस्टीन फाईल्स प्रकरण दाबण्याचा संघाकडून प्रयत्न सुरु आहे. अशातच या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी भाष्य करत टीका केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पीएम मोदी : एपस्टीन फाइल्स सारख्या प्रकरणात नरेंद्र मोदी यांचं नाव येणे गंभीर
संघ आणि काँग्रेसचे मतभेद हा वेगळा भाग आहे. त्यांच्यावर टीका करत असलो तरी अपेक्षा व्यक्त करणे राजकारणाचा भाग आहे. मागे जातीय दंगली झाल्या तेव्हा रेशिमबागमध्ये मोर्चा नेण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असताना संघ नोंदणी करण्यासाठी मागणी केलीहे. यावेळी आम्ही शांततेने आमचा संवाद पोहचवला, यावेळी देखील तोच प्रयत्न असणार. एपस्टीन फाइल्स सारख्या गंभीर प्रकरणात नरेंद्र मोदी यांचं नाव येणे गंभीर आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी आमची मोर्चातून मागणी असणार आहे, असेही काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
Harshwardhan Sapkal : एपस्टीन फाईल्सवरून विषय भरकटवण्यासाठी ही राज्यातील खरात फाईल
मुख्यमंत्री यांचा अहंकार प्रत्येक शब्दातून टपकतो. कोणत्याही माणसाकडे ज्ञान नाही, माझ्याकडेच आहे. असा अहंकार त्यांच्या वाक्यातून दिसून येतो. अधिवेशन सुरू असल्याने अनेक नेते तिथे गेले. सर्वांचा या मोर्चाला पाठिंबा आहे. वंचित आणि आमची तीच भूमिका असल्याने संयुक्त मोर्चा काढत आहोत. यामध्ये राजकीय रूप द्यायचे नाही आणि कोण मोठा हे दाखवायचं नाही. मूळ एपस्टीन फाईल्सवरून विषय भरकटवण्यासाठी ही राज्यातील खरात फाईल उघडण्याचा त्यांच कांगावा असावा. एपस्टीन फाईल आली तेव्हा विकृत माणूस किळसवाणा प्रकार करत होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुंग गिळून गप्प होत. रुपाली राजीनामामध्ये व्ययक्तिक कारणासाठी राजीनामा दिला, असा उल्लेख होता. खालच्या अधिकाऱ्याच लॉबिंग खरात आणि नेते कोणाशी संबंध याची चौकशी व्हावी. हा मुद्दा जनतेपर्यंत पोहचला आहे. अनेक तरुण अस्वस्थ आहेत. सभ्यतेच्या बुरखा मोदी आणि त्यांच्या सहकार्याचा लवकर फाटणार. असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दत्ता मेघे यांच्यावर हर्षवर्धन सपकाळ : दत्ता मेघे हे विदर्भाचे नव्हे, तर महाराष्ट्रचं नेतृत्व
दत्ता मेघे हे विदर्भाचे नव्हे, तर महाराष्ट्रचं नेतृत्व आहेबस्स. त्याच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य दोन्ही सभागृहात त्यांचं नेतृत्व होतं. शिक्षणासाठी संस्थाचं जाळं त्यांनी रोवएल. त्यांचा बराच काळ काँग्रेसमध्ये गेला. त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली.
Harshwardhan Sapkal : देशभरात अनेक नेत्यांनी राजीनामा दिला, आपल्या नेत्यांनी गेंड्याची कातडी घातलीहे
आपली इंधनाची सुरक्षितता एपस्टीन फाईलमुळे अडकली आहे. देशाचे पंतप्रधान या दबावामुळे काम करत आहेत. इंधन पुरवठा खंडित झाल्याचं कुठेही बोलताना दिसून येत नाही. एपस्टीन फाईलमध्ये बरच काही आहे. आगे आगे देखो क्या होता है! देशभरात अनेक नेत्यांनी राजीनामा दिला. आपल्या नेत्यांनी गेंड्याची कातडी घातली आहे. असेही असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.