भाजप आक्रमक होताच हर्षवर्धन सपकाळांनी सावरकरांचं शिवरायांविषयीचं ‘ते’ वक्तव्य बाहेर काढलं, म्हण
हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान: टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (हर्षवर्धन सपकाळ)यांनी केले होते. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान (Tipu Sultan) यांनी त्याच समकक्ष काम केलं आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समकक्ष मानले गेलं पाहिजे, असे मत त्यांनी मांडले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपने टीकेची झोड उठवली होती. यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला (BJP) त्यांच्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला वंदनीय असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्याचा दाखला देत भाजपला सवाल विचारला आहे. ते वर्धा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपला निवडणुकीत टिपू सुलतान चालतात. टिपू सुलतान यांचे छायाचित्र हे महानगर पालिका निवडणुकीत भाजपच्या घोषणापत्रात होते. माझा पुतळा जाळण्याऐवजी सावरकरांनी ‘ शिवाजी महाराज यायला… कावळा बसायला आणी डांग तुटायला.’ असे जे वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने त्यांचे पुतळे भाजप जाळणार आहे का? महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवाजी महाराजांबाबत इतकं विकृत बोलले. त्यामुळे त्यांचेही पुतळे आपण जाळणार आहात का?, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.
देवेंद्रजी अमरावतीमध्ये आपल्या भाजपने एमआयएमचे मतदान घेतले. चंद्रपूर येथे एमआयएमच्या मदतीने आपण महापौर बसवला. महाराष्ट्रात 21 ठिकाणी आपण आघाडी करता, युती करता, मदत करता, तुमची युती आता लपून राहिलेली नाही. असे असताना काँग्रेससारख्या धर्म निरपेक्ष पक्षावर टीका करणं उचित नाही. महापुरुषांच्या फोटोवर भाजप जे आक्षेप घेत आहे. हा त्यांचा संविधान संपविण्याचा डाव आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
Harshvardhan Sapkal: हिंदू-मुस्लीम तेढ वाढवण्यासाठी भाजपकडून माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढून वापर केला जातोय: हर्षवर्धन सपकाळ
मुळात तथाकथित वाद जो निर्माण झाला आहे, माझ्या वक्तव्याच्या अनुषंगाने भाजप जी गरळ ओकते आहे. मसा शिवाजी महाराज आपल्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही. हे याठिकाणी विनम्रतेने आणी स्वाभिमानाने सांगू इच्छितो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची शान आहेत. त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या पराक्रमामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले आणि त्या स्वराज्याची प्रेरणा थेट स्वरूपामध्ये आपल्या संविधानापर्यंत आहे. काल पत्रकारांनी प्रश्न विचारत असताना विचारले की, महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणी टिपू सुलतान यांचे छायाचित्र कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. याकडे आपण कसे बघता त्याच्या उत्तरादाखल माझं जे उत्तर होतं. ते हे होतं की, शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला. त्याचाच आदर्श हा टिपू सुलतान यांनी घेतला. टिपू सुलतान हे शिवरायांचा आदर्श घेऊन इंग्रजाशी ते लढले. त्या अनुषंगाने माझे वक्तव्य आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
मला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला दाबून कुठेतरी हे वक्तव्य चालविण्यात येत आहे. हा भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे. देवेंद्र फडणवीस यांची तुलना मी औरंगजेबाशी केली. तेव्हा ते म्हणाले मी त्यांना ओळखत नाही. मी त्यांना जल्लाद म्हटले, मी त्यांना क्रूर असण्याच्या अनुषंगाने ‘दरींदा’ म्हटले. त्यावेळेसही त्यांनी मला ओळख दाखविली नाही. काल, मात्र आवेशात येऊन जे काही त्यांनी माझ्याबदल गरळ ओकली. याचा स्पष्ट अर्थ आहे की महाराष्ट्रत जे मूलभूत मुद्दे आहे आणि दिल्ली स्तरावर ज्या फाईलमध्ये बरंच काही लपलेलं आहे. त्यापासून त्यांना इतरत्र लक्ष वेधण्याचे आहे. प्रत्येक बाबतीत जात आणणे, प्रत्येक बाबतीत धर्म आणणे, भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंड आहे. माझ्या वक्तव्याचाही त्याच धोरणाप्रमाणे विपर्यास करुन हिंदू-मुस्लिम तेढ वाढवण्यासाठी भाजप या सगळ्याला खतपाणी घालत आहे. भाजप हा माफीवीरांचा पक्ष आहबे, त्यामुळेच त्यांनी माफीचा आग्रह धरला आहे. शिवाजी महाराजांचा जो स्वाभिमान आणि आमचा अभिमान आहे तो मी त्यातही अधोरेखित केला होता. टिपू सुलतान यांच्या अनुषंगाने महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो भाजपने आपल्या घोषणापत्रात वापरले होते, असा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता.
आणखी वाचा
टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका
आणखी वाचा
Comments are closed.