गांधीहत्येच्या कटात भगूरचा 60 रुपये पेन्शन घेणारा सहआरोपी होता, हर्षवर्धन सपकाळांची आक्षेपार्ह
नशिकमधील हर्षवर्डन सपकल: महात्मा गांधीजी यांची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला होता. नथुराम गोडसे (Nathuram Godse) हा पहिला दहशतवादी होता. महात्मा गांधीजी यांचा खूनच झाला होता. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गांधींजींच्या खूनाच्या (Mahatama Gandhi Murder) जागी वध असा शब्द टाकला. महाराष्ट्र ग्रंथातून हा शब्द हटवण्यात आला आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केले. ते गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सावरकरांबाबतही अप्रत्यक्ष टीका करताना एक वक्तव्य केले. या वक्तव्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी सावरकर हे गांधीहत्येच्या खटल्यातील आरोपी असल्याचे अधोरेखित करताना त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. नथुराम गोडसे हा गांधी हत्येच्या कटातील एक आरोपी होता. सहआरोपींमध्ये भगूरच्या आरोपीचा समावेश होता. हा आरोपी ब्रिटिशांकडून 60 रुपये पेन्शन घेणारा होता. मात्र, पुराव्याअभावी या भगूरच्या आरोपीची मुक्तता करण्यात आली. स्वातंत्र्यलढ्यात त्याचे वक्तव्य काय, हा भाग वेगळा. या आरोपीने जेलमध्ये माफीनामा दिला होता. कपूर आयोगाच्या अहवालात या सर्व गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. या आरोपीने द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता. त्यानेच गांधीहत्या घडवून आणली. मी या गोष्टी पुराव्यानिशी बोलत आहे. माझ्यावर कोणाला कोर्टात केस टाकायची असेल तर टाकावी, असे आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. यावर आता भाजप आणि शिंदे गटाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक होत आहे. या बैठकीत उत्तर महाराष्ट्राचा जिल्हानिहाय आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वादडेट्टीवर, बाळासाहेब थोरात यांच्यांसह इतर नेते उपस्थित आहेत.
Balasaheb Thorat on Gandhi: नथुराम गोडसेचं उदात्तीकरण ही भाजपची विकृत मानसिकता: बाळासाहेब थोरात
भाजपकडून महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण केले जाते. यामधून भाजपची विकृत मानसिकता दिसते. देश कसा चालला आहे, हे यावरुन कळते. गांधी खून हा कायम चर्चेचा विषय असतो. वादाला प्रतिवाद करण्याची संधी दिली पाहिजे, त्याला प्रतिवाद करा. ही खरी लढाई आहे. या देशाला महात्मा गांधीजींच्या विचारावर आणावे लागणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आरोपांना उत्तर द्या. त्यांनी मला कोर्टात खेचा, असे सांगितले असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
Nashik News: नाशिकच्या कोर्टात सावरकरांवरील वादग्रस्त वक्तव्याबाबतच्या खटल्याची सुनावणी
नाशिकमधील न्यायालयात आज दोन महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे. पहिले प्रकरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत आहे. तर दुसरी सुनावणी माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवार यांच्या विरोधात केलेल्या बदनामीच्या दाव्यासंदर्भातील आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.