HDFC बँकेची सीक्रेट डील, 45 कोटींचं पेमेंट वादात, रिपोर्ट समोर येताच खळबळ, बँकेचे शेअर गडगडले

मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसी बँक अडचणीत आली आहे.  इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं शोधपत्रकारिता करत एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे, त्यानुसार एचडीएफसी बँकेतील 45 कोटींचं पेमेंट वादात अडकलं आहे. याचा परिणाम म्हणून एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये बुधवारी  20 रुपयांची घसरण झोली आहे. एचडीएफसीचा शेअर 758.65 रुपयांवर आला आहे.

एचडीएफसी बँकेतील 45 कोटींचं प्रकरण काय?

एचडीएफसी बँकेनं 2021 मध्ये एमएसआरडीसीकडे ठेवींसाठी चर्चा केली. एमएसआरडीसीनं जमीन अधिग्रहण फंडमधून 25 हजार कोटींची ठेव ठेवण्याचं आश्वासनं दिलं. मात्र, एमएसआरडीसीनं त्यांना इतरांकडून 6 टक्के व्याज मिळत असल्याचं सांगण्यात आलं. यावर एचडीएफसी बँकेनं 6.01 टक्के व्याज एमएसआरडीसीच्या ठेवीवर देण्यास सहमती दर्शवली. प्रत्यक्षात बँक इतरांना 3.5 टक्के व्याज देत होती. बँकेनं अतिरिक्त 2.51 टक्के व्याज एमएसआरडीसीला दिलं. मात्र, अतिरिक्त व्याजाची रक्कम एमएसआरडीसीला थेट न देता मार्केटिंग विभागातर्फे वेंडर्स तर्फे रस्ता सुरक्षा मोहिमेचं प्रायोजकत्व दाखवून देण्यात आली.  वेंडर्सकडून एजन्सी फी, जीएसटी आणि टीडीएस वजा करुन रक्कम देण्यात आली. फेब्रुवारी 2022 पासून एमएसआरडीसीनं एचडीएफसी बँकेत ठेवी ठेवण्यास सुरुवात केली. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आणि  2024-25 मध्ये चार वेंडर्स मार्फत 45 कोटी रुपये देण्यात आले.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

सामाजिक कार्यकर्त्या काल एका वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती. फिक्स डिपॉझिटचा व्याज दर आरबीआयच्या सांगण्यावरुन बदललं जातं.एचडीएफसी बँकेने कॅमोफ्लाज करून एक गंभीर बाब केली. एफडीत फिक्स्ड व्याजदर होता, आरबीआयनुसार ते बदलत जातं. एमएसआरडीसीला त्यांचा जमीन अधिग्रहासाठी आलेला निधी या बँकेत ठेवायचा होता. इतर बॅंका ज्या व्याजदर देत आहे ते देऊ अशी मागणी झाली करण्यात आली.  आरबीआयच्या कायद्यात 3.50 टक्क्यांच्या वर व्याजदर देता येत नाही पण सीईओनी चार वेंडर्सना बोलावून खर्च दाखवण्यात आला, रस्त्यावर चालताना सुरक्षा कशी करावी यासाठी पैसे ट्रान्स्फर करण्यात आले.यात सगळे कायदे मोडून, एक मोठा कट गेला, 4 वेंडर ला बोलवून हा खर्च एचडीएफसीच्या मार्केटिंग कडून झाला आहे असे दाखवा, असं सांगण्यात आलं, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

कोणीही ऑर्डर न देता ज्युनिअर ऑफिसरला हे करायला भाग पाडलं गेल. कोणताच क्लिअरन्स नव्हते तरी  2.51 टक्के व्याजाचे पैसे दिले गेले. एचडीएफसीनं वेंडर पैसे  दिले त्यांनी एमएसआरडीसीला दिले, असे 45 कोटी रूपे दिले गेले, असं अंजली दमानियांनी म्हटलं.  यावर सेबी, आरबीआयची कारवाई व्हायला पाहिजे. एचडीएफसी बँक ही प्रख्यात बँक आहे. कुठल्याही बॅंकेला असे व्यवहार करता येत नाहीत, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं.

एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये घसरण

एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये काल 2.60 टक्क्यांची घसरण झाली आहे. 778.90 रुपयांवरुन  बँकेचा शेअर 20 रुपयांनी घसरुन 758 रुपयांवर आला आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.