फटाक्यांची विक्री 25 टक्क्यांनी घटली
दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असला तरी यंदा फटाक्यांच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. महागाईमुळे फटाक्यांचे वाढलेले दर, पर्यावरणाविषयी वाढती जागरूकता आणि रस्त्यावर फटाके उडवण्याबाबत न्यायालयाचे निर्बंध यामुळे ग्राहकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवली. विक्रीत 20 ते 25 टक्क्यांची घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
दिवाळी म्हटलं की, फटाक्यांची आतषबाजी ही आलीच. पंधरा दिवस आधीपासूनच मार्केटमध्ये फटाक्यांची दुकाने लागतात. खरेदीसाठी खासकरून बच्चेकंपनीची झुंबड उडते. सिक्रेट बॉम्ब, फुलबाजा, पाऊस, भुईचक्र, रॉकेट, स्काय शॉट, सुतळी बॉम्ब, फटाक्यांची माळ अशा विविध फटाक्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत; मात्र ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला.
शोभिवंत फटाक्यांची क्रेझ
जादा आवाज आणि प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांपेक्षा शोभिवंत फटाक्यांची क्रेझ कायम आहे. महागाईमुळे फटाक्यांच्या किमती 10 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
Comments are closed.