बारावीची 8, तर दहावीची 15 फेब्रुवारीपासून परीक्षा, राज्य शिक्षण मंडळाकडून वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी, तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर 6 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक हे अंतिम असेल. छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
- बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 18 मार्च 2027 या कालावधीत होणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जानेवारी ते 6 फेबुवारी 2027 या कालावधीत पार पडतील.
- दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीला चालू होणार असून 15 मार्च 2027 ला संपणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 या कालावधीत होईल.
Comments are closed.