मी झालमुरी खाल्ली आणि तृणमूलला जळजळ जाणवली.
पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शाब्दिक हल्लाबोल
वृत्तसंस्था/कृष्णानगर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या कृष्णानगर येथील सभेला संबोधित केले. येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी तृणमूल काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत त्यांच्या धोरणांवर टीका केली. झालमुडी मी खाल्लो, परंतु मिरची तृणमूल काँग्रेसला लागली, असे उद्गार मोदींनी काढले आहेत. बंगालमध्ये पंतप्रधान मोदींनी एका दुकानावर जात झालमुडी खाल्ली होती. पंतप्रधान मोदींचे हे नाटक होते, झालमुडीच्या दुकानात माइक लावण्यात आला होता, मग एसपीजीकडून झालमुडी तयार करविण्यात आली, जेणेकरून एक नाटक रचता येईल. मोदी कधी निवडणुकीच्या काळात गुहेत जातात, कधी स्वत:ला चहावाला संबोधून घेतात, झालमुडीच्या दुकानात पूर्वीच कॅमेरा लावण्यात आला होता, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केला होता.
‘झाल’ तृणमूल काँग्रेसला
4 मे रोजी बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा जल्लोष केला जाणार असून त्यात मिठाईसोबत झालमुडीही वाटण्यात येईल. झालमुडीने काही लोकांना झटका दिला. मी झालमुडी खाल्ली, परतु ‘झाल’ तृणमूलला लागली असे मोदींनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाचे कौतुक
मागील 50 वर्षांमध्ये या निवडणुकीत सर्वात कमी हिंसा दिसून येतेय. हे निवडणूक आयोगाचे मोठे यश आहे. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये दर आठवड्याला कुणाला फासावर लटकविले जात होते. बंगालमध्ये अराजकता आणि गुंडगिरीचे राज्य होते. परंतु निवडणूक आयोगाने पुन्हा बंगालच्या भूमीवर लोकशाहीची प्रतिष्ठा स्थापित केली असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले.
भय जातेय, भरवसा येतोय
कृष्णानगरमध्ये आता भयावर भरवशाच्या विजयाचा विश्वास दिसून येत आहे. अनेक वर्षांपासून ज्यांचा आवाज दडपण्यात आला होता, ते आता एका सुरात बोलत आहेत. तृणमूलचे आमदार, मंत्री, स्थानिक नेते आणि त्यांच्या सिंडिकेटच्या विरोधात इतका संताप आहे की, तृणमूल अनेक शहरांमध्ये स्वत:चे खातेही उघडू शकणार नाही. 15 वर्षांपूर्वी लोकांनी डाव्यांच्या विरोधात बिगुल फुंकला होता. आता तृणमूलच्या जंगलराजच्या विरोधात बंगालची जनता शंखनाद करत असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
Comments are closed.