‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, अजित पवारांनी सांगितली 1991 सा
बारामती: सध्या राज्यभरात चर्चेत असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे (Malegaon Sugar Factory) बारामतीतील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती तालुक्यातील पणदरे गावातील मतदारांना भावनिक साद घालत निवडणुकीत साथ देण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी अजित पवारांनी मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने मी डायरेक्ट झालो, असं म्हटलं आहे. तर मी कामाच्या बदल्यात कधीही एक रुपया घेतला नाही त्याच्यामुळे मी ताठ मानेने बोलतो आहे. सीएसपींची बदली करायला सात सात आठ कोटी दिले जातात असं बोललं जातं. मी कधीही बदलीसाठी पैसे घेतले नाहीत. मला गरज नाही पैसे घ्यायची असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. (Malegaon Sugar Factory)
कारखाना खाजगी करायला वेड लागलं आहे का?
पुढे बोलताना ते म्हणाले, माझ्या वेगवेगळ्या कंपनीतून काही कोट मी सीएसआर फंड देतो, मला कशाची कमी नाही. मी कुठल्याही प्रकारची बिले लावणार नाही. मला कारखाना खाजगी करायला वेड लागलं आहे का? मी सहकाराचा पुरस्कर्ता आहे. 1991 साली शरद पवारांना काही जण म्हणाले, अजितला चेअरमन करा शरद पवार म्हणाले अरे थोडा अनुभव येऊ द्या मग करू, काय नाय करायचं म्हटले, पण त्यांना काय माहिती एकदा बँकेत आला की जायचा नाही. 35 वर्षे झालं बँक हातात घेतली सोडलीच नाही. मी शिव, शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचाराचा अर्थसंकल्प मांडतो आहे. योजना बंद करणारी आमची औलाद नाही. जर मी पाच वाजता नाही उठलो तर कोण माझं वाकडं करणार आहे? जावा मुंबईला दहा/ अकरा वाजेपर्यंत मंत्री भेटत नाहीत. मी कोणावरती टीका करत नाही पण खरं बोलतोय, असंही पुढे अजित पवार म्हणालेत.
पुढच्या पाच वर्षात मी माळेगावला 500 कोटी देणार
पुढच्या पाच वर्षात मी माळेगावला 500 कोटी देणार आहे. पुढची तुमची सगळी काम हाच अजित पवार करणार आहे. कोणी माईचा लाल करू शकत नाही. कुणीही सांगावं अजित पवार खोटं बोलतोय. मी राजकारण सोडेल. मी खाजगी धंदा केला तर हेलिकॉप्टरनेन विमानाने फिरेल. सकाळपासून धंदा केला तर किती पैसा कमवेल. अजित पवारांची बायको 48 हजार मतांनी पडली. त्याच अजित पवारांना 1 लाखापेक्षा जास्त मताने निवडून आला आहे. महाराष्ट्राचं लक्ष माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लागलेले आहे. तुमच्या अजित पवार यांना पुन्हा राज्यात ताठ मानेने पाठवायचं का हे तुम्ही ठरवायचं, असं म्हणत अजित पवारांनी मतदारांना साद घातली आहे.
काका-पुतण्या पुन्हा आमने-सामने
कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. बारामती तालुक्यातील राजकारणाचं महत्वाचं केंद्र असलेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 22 तारखेला निव़डणूक होणार आहे. हा स्थानिक प्रश्न असल्याचं सांगत असले तरी शरद पवार स्वत: प्रचारात उतरले आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार ब गटातून स्वत: अध्यक्षपदासाठी उभे आहेत तर दुसरीकडे युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली पॅनलची सगळी सूत्रं स्वत: शरद पवारांनी हाती घेतली आहेत. लोकसभा, विधानसभेनंतर माळेगाव कारखाना निवडणुकीत तिसऱ्यांदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.