“नोट सेलिब्रेशनवर बंदी घातली पाहिजे, हा निव्वळ मूर्खपणा”; 6 वेळेच्या आयपीएल चॅम्पियनची मागणी
खेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रेशन खेळाडू करतात. आयपीएलमध्येही खेळाडू विकेट्स घेतल्यानंतर, शतक किंवा अर्धशतक केल्यानंतर अनोख्या पद्धतीने त्याचे सेलिब्रेशन करतात, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. सध्या नवा ट्रेंड सुरू आहे, खेळाडू आापल्या खिशातून एक कागदाची चिठ्ठी काढून सर्वांना दाखवतात. त्यांच्या या नव्या सेलिब्रेशनने एक माजी खेळाडू चांगलाच चिढला आहे.
खेळाडूने दाखवलेल्या चिठ्ठीवर कॅमेरामन फोकस करून त्याचा चांगला फोटो काढत नाही, तोपर्यंत मैदानावर उपस्थित असलेल्या चाहत्यांनाही ती नीट वाचता येत नाही. त्यानंतर त्यावर काय लिहिले आहे, हे व्हायरल होते. शुक्रवारी (१५ मे) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना खेळला गेला, त्यामध्येही असेच घडले.
एलएसजीचा गोलंदाज आकाश सिंगने ऋतुराज गायकवाडला बाद केल्यानंतर सर्वप्रथम चिठ्ठी काढली. तसेच त्याने संजू सॅमसन आणि उर्विल पटेल यांना बाद केल्यानंतरही त्याने तेच सेलिब्रेशन केले. या नोट सेलिब्रेशनबद्दल क्रिकेट पंडितांची वेगवेगळी मते आहेत.
काहींच्या मेत खेळाडू हे या सेलिब्रेशनद्वारे आपल्या भावना व्यक्त करतात, तर काहींच्या मते खेळाडूंनी नवीन सेलिब्रेशन शोधून काढले पाहिजे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा तज्ज्ञ अंबाती रायुडू हा आकाशच्या सेलिब्रेशनवर नाराज दिसला. त्याने तर आयपीएलमध्ये अशा चिठ्ठ्यांवर बंदी घातली पाहिजे असेही मत व्यक्त केले आहे.
आकाशच्या चिठ्ठीवर लिहिले होती की, अक्कीच्या तोंडातून आग बाहेर पडले, टी २० सामन्यात विकेट कशी घ्यायची हे आकाशला माहित आहे.
रायुडू एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला, “मला वाटते हे त्या खेळाडूंचे मेनीफेस्टेशन (प्रकटीकरण) आहे, जे काहींना आवडणार नाही. हे थोडे मजेशीर आणि थोडासा वेडेपणा आहे. माझ्या मते, अशा चिठ्ठ्यांवर (नोट सेलिब्रेशन) बंदी घातली पाहिजे. हा निव्वळ मुर्खपणा आहे.”
या हंगामात असे सेलिब्रेशन उर्विल पटेल आणि मुंबई इंडियन्सच्या रघु शर्मा यांनीही केले आहे.
Comments are closed.