IPLच्या धिंगाण्यात टीम इंडियाचा कसोटीत धमाका; कांगारूंना फुटला घाम, इंग्लंडचा माज उतरवला, WTC P
ICC पुरुष कसोटी संघ क्रमवारी अपडेट: सध्या जगभरात आयपीएलची चर्चा सुरू असतानाच, आयसीसीने शुक्रवारी (1 मे, 2026) आपली वार्षिक कसोटी क्रमवारी जाहीर केली. या निकालानुसार, भारताने कसोटी क्रमवारीत प्रगती करत अव्वल तीनमध्ये स्थान मिळवले आहे. मात्र, या क्रमवारीचा त्यांच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील (WTC) स्थानावर परिणाम होईल का, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. टीम इंडियाची WTC मधील कामगिरी खराब असून, ते सध्या सहाव्या स्थानावर आहेत.
WTC गुणतालिकेवर परिणाम नाही
ICC च्या नव्या टेस्ट रँकिंगनुसार भारत चौथ्या स्थानावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही प्रगती नक्कीच सकारात्मक असली, तरीही यामुळे सर्व समस्या सुटल्या आहेत असं म्हणता येणार नाही. कारण भारताच्या सध्याच्या WTC स्थानावर कोणताही परिणाम होणार नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू हंगामात टीम इंडिया सहाव्या क्रमांकावर आहे. मायदेशात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. आता, जर भारताला अंतिम फेरीत पोहोचायचे असेल, तर त्यांना त्यांच्या उर्वरित बहुतेक मालिका जिंकाव्या लागतील.
वार्षिक अपडेटमध्ये आयसीसी पुरुष कसोटी संघ आणि महिला एकदिवसीय संघ क्रमवारीत ऑस्ट्रेलिया सर्वोच्च स्थानावर आहे 🔝
तपशील 👇https://t.co/rWfD9x2wCW
— ICC (@ICC) 1 मे 2026
फायनलची आशा जिवंत ठेवण्यासाठी आता ‘करो या मरो’ परिस्थिती
सध्या टीम इंडिया गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरली असून, फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण बनला आहे. भारताच्या या खराब स्थितीमागे काही ठळक कारणे समोर आली आहेत. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला अनपेक्षित पराभव हा मोठा धक्का ठरला. याशिवाय संपूर्ण हंगामात सातत्याचा अभाव आणि निर्णायक क्षणी संघाची घसरलेली कामगिरी यामुळे गुणतालिकेत मोठं नुकसान झालं. सहाव्या स्थानावर असणं म्हणजे फायनलची शर्यत जवळपास हातातून निसटल्यासारखी वाटत असली, तरी गणित अजून संपलेलं नाही. मात्र आता भारतासाठी प्रत्येक सामना ‘करो या मरो’ ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर
आयसीसीच्या ताज्या अपडेटपूर्वी टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर होती आणि या वार्षिक अपडेटनंतर भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर, विद्यमान कसोटी चॅम्पियन दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड एका स्थानाने घसरून तिसऱ्यावरून चौथ्या क्रमांकावर आला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाने एका स्थानाची झेप घेत सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.
महिला एकदिवसीय क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर
भारतीय संघाने नोव्हेंबरमध्ये प्रथमच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून इतिहास रचला. असे असूनही, भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसीच्या वार्षिक एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर कायम आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंड दुसऱ्या स्थानावर असून, त्याखालोखाल दक्षिण आफ्रिका चौथ्या, न्यूझीलंड पाचव्या आणि श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. बांगलादेश पाकिस्तानच्या वर सातव्या स्थानावर आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.