भाजप-शिवसेना एकमेकांविरोधात लढले तर लाडक्या बहिणींनी कोणाला मत द्यायचं? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच
नागपूर: राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहु लागले आहे. २ डिसेंबर रोजी होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘लाडक्या बहिणींचे मत’ कोणाच्या बाजूने वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी सुरू केलेल्या महायुतीला लाडक्या बहिणींनी (ladki bahin yojana) मताधिक्य मिळवून देत सत्तेच्या चाव्या दिल्या. आता पालिका निवडणुकीत, राज्यभरात महायुतीत असलेले पक्ष स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयानुसार स्वबळावर निवडणुका लढवत आहेत, त्यामुळे आता लाडक्या बहिणी राजकीय आखाड्यात ‘गेमचेंजर’ ठरणार आहेत. काही ठिकाणी महायुतीतील पक्षच एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणी (ladki bahin yojana) नेमक्या कोणाला निवडून देणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे, याचं उत्तर आता महायुतीत मित्रपक्ष असलेले शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.(ladki bahin yojana)
मराठी: लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू
जेथे भाजप व शिवसेना एकमेकाच्या विरोधात लढत आहे, तेथे लाडक्या बहिणींनी कोणाला मतदान करायचे? या पत्रकारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना म्हटलं की, मी लाडकी बहीण सुरू केली. लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाले, महायुती सरकारने सुरू केलेल्या आमच्या टीमने सुरू केली होती, मी मुख्यमंत्री होतो आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते, टीम म्हणून आम्ही ती योजना सुरू केली. लाडक्या बहिणींना किती अडथळे आले ते देखील माहित आहे, परंतु आम्ही एकदा निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू आणि अंमलबजावणी करण्याची, कोणी कितीही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असंही पुढे एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
मराठी:मी मुख्यमंत्री असताना देखील जिथे आमचा नगराध्यक्ष नव्हता तिथेही…
तर महानागरपालिका निवडणुका प्रचार या सर्व बाबींवर भाष्य करत एकनाथ शिंदे म्हणाले, विदर्भात कालपासून प्रचार करतो आहे, प्रचार सभांना उपस्थित राहिलो, प्रचंड उत्साह विशेष करून लाडक्या बहिणींमध्ये दिसून येत आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सभेमध्ये उत्स्फूर्तपणे उपस्थिती होती, यावरून शिवसेनेचे जिथे जिथे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी स्थानिक पातळीवर जनता उभे राहिल्याचे चित्र पाहिले आहे आणि विकासाचा मुद्दा आमचा आहे. मी मुख्यमंत्री असताना देखील जिथे आमचा नगराध्यक्ष नव्हता तिथेही आम्ही विकासाला पैसे दिले आहेत, म्हणून विकासाच्या मुद्द्यावर, पाणी, गटार, मैदान, उद्यान,आरोग्य व्यवस्था या सगळ्यांसाठी आम्ही पैसे दिले होते, असंही ते म्हणालेत.
आणखी वाचा
Comments are closed.