इम्रान खान यांची पुन्हा तुरुंगात रवानगी
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) संस्थापक इम्रान खान यांना शुक्रवारी पहाटे वैद्यकीय तपासणीसाठी इस्लामाबादमधील शिफा इंटरनॅशन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तपासणीनंतर त्यांना पुन्हा अदियाला तुरुंगात हलवण्यात आले आहे. इम्रान यांच्या प्रकृतीबाबत समर्थक आणि कुटुंबीयांकडून गेल्या काही काळापासून चिंता व्यक्त केली जात होती.
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने अधिकाऱ्यांना इम्रान खान यांना 48 तासांच्या आत शिफा इंटरनॅशन हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, इम्रान खान यांच्यासाठी रुग्णालय परिसरात मोठय़ा प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विविध सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांचे 800 हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
Comments are closed.