मजिठिया यांनी भाजप-अकाली दल युतीचे संकेत दिले
जालंधर: पुढील वर्षी पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते विक्रम सिंह मजीठिया यांनी पंजाबची जनता पुन्हा एकदा अकाली दल आणि भाजपला एकजूट पाहू इच्छित असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांना जोर आला आहे. शिरोमणी अकाली दल आणि भाजपने दीर्घकाळापर्यंत एकत्र काम केले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि प्रकाश सिंह बादल यांनी या आघाडीला मजबूत केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातही ही आघाडी जारी राहिली. कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवर आमचे मार्ग वेगळे झाले होते, परंतु पंजाबममधील सामाजिक सलोखा अन् सीमावर्ती राज्याची स्थिती पाहता जनता पुन्हा दोन्ही पक्षांनी एकत्र यावे असे इच्छित असल्याचे मजीठिया यांनी स्पष्ट केले आहे.
Comments are closed.