भारतात हिंदू लोकसंख्येचा वाढीचा दर इतर धर्मांच्या तुलनेत कमी आहे.

2070 पर्यंत धार्मिक लोकसंख्येच्या समीकरणात बदल : प्यू रिसर्च सेंटरचा अनुमान

वृत्तसंस्था/न्यूयॉर्क

भारतासह जगभरातील धार्मिक लोकसंख्येच्या रचनेत आगामी काही दशकांत बदल होण्याची शक्मयता आहे. प्यू रिसर्च सेंटरने प्रसिद्ध केलेल्या अहवालात 2035 आणि 2070 पर्यंत विविध धर्मांच्या लोकसंख्येतील संभाव्य बदलांचा अंदाज व्यक्त केला आहे. भारताच्या बाबतीत 2070 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या वाढणार असली, तरी मुस्लीम आणि इतर धर्मीयांच्या तुलनेत तिचा वाढीचा वेग कमी राहण्याची शक्मयता अहवालात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या धार्मिक लोकसंख्येच्या प्रमाणात काही प्रमाणात बदल होऊ शकतो.

प्यू रिसर्च सेंटरच्या अंदाजानुसार, 2020 मध्ये भारतातील हिंदूंची लोकसंख्या सुमारे 110 कोटी होती. 2070 पर्यंत ती 16 टक्क्मयांनी वाढून जवळपास 130 कोटींवर पोहोचण्याची शक्मयता आहे. म्हणजेच या कालावधीत हिंदूंच्या लोकसंख्येत सुमारे 17.6 कोटींची भर पडू शकते. दुसरीकडे, भारतातील हिंदूंव्यतिरिक्त इतर धर्मीयांची एकत्रित लोकसंख्या 2020 मध्ये 28.9 कोटी होती. ती 42 टक्क्मयांनी वाढून 2070 पर्यंत 41.1 कोटी होण्याचा अंदाज आहे. या कालावधीत गैरहिंदू लोकसंख्येत सुमारे 12.2 कोटींची वाढ होऊ शकते.

जगभरातील हिंदूंची लोकसंख्याही वाढणार

जागतिक स्तरावर 2020 मध्ये हिंदूंची लोकसंख्या सुमारे 120 कोटी होती. पुढील 50 वर्षांत ती वाढून 2070 पर्यंत जवळपास 140 कोटी होण्याचा अंदाज आहे. याच काळात हिंदूंव्यतिरिक्त इतर धर्मीय आणि धर्म न मानणाऱ्या लोकांची एकत्रित लोकसंख्या 670 कोटींवरून वाढून 880 कोटींपर्यंत पोहोचू शकते.

पाकिस्तानमध्ये मोठी वाढ

अहवालानुसार, आगामी दशकांत पाकिस्तानच्या मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्मयता आहे. सध्या इंडोनेशियामध्ये जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या आहे. मात्र, 2070 पर्यंत पाकिस्तान इंडोनेशियाला मागे टाकू शकतो. त्यानंतर सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत, नायजेरिया आणि इंडोनेशिया यांचा क्रमांक लागण्याचा अंदाज आहे.

प्यू अहवालातील महत्त्वाचे अंदाज

  • 2035 पर्यंत बदलाचे संकेत : जागतिक स्तरावर मुस्लीम लोकसंख्या ख्रिश्चन लोकसंख्येला मागे टाकण्याची शक्मयता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
  • प्रजननदरातील फरक : 2020 ते 2025 या कालावधीत मुस्लीम महिलांचा सरासरी प्रजननदर 3.1, तर ख्रिश्चन महिलांचा 2.5 अपत्ये असल्याचा अंदाज आहे.
  • 2035 मधील लोकसंख्या : मुस्लिमांची संख्या 257 कोटी, तर ख्रिश्चनांची संख्या 252 कोटी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
  • 2070 पर्यंत मुस्लीम लोकसंख्या : जगभरातील मुस्लिमांची संख्या 360 कोटींच्या पुढे जाण्याची शक्मयता आहे. ख्रिश्चनांची संख्या सुमारे 300 कोटी राहू शकते.
  • अमेरिका आणि पॅनडातील बदल : पुढील चार दशकांत या देशांमध्ये ख्रिश्चन धर्मीयांचे बहुमत राहणार नाही, असा अंदाज आहे. धर्म न मानणाऱ्यांची संख्या वाढणे हे त्यामागील एक कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
  • आफ्रिकेतील लोकसंख्यावाढ : आगामी दशकांमध्ये जगातील लोकसंख्यावाढीचा मोठा हिस्सा आफ्रिकेतून येण्याची शक्मयता आहे.
  • युरोपच्या लोकसंख्येत घट : 2070 पर्यंत युरोपची एकूण लोकसंख्या 17 टक्क्मयांनी कमी होण्याचा अंदाज आहे. ख्रिश्चन लोकसंख्या 32.4 कोटींवर येऊ शकते.
  • धर्म न मानणाऱ्यांची संख्या वाढणार : 2070 पर्यंत जगभरात कोणताही धर्म न मानणाऱ्या लोकांची संख्या 18 कोटींहून अधिक वाढण्याची शक्मयता आहे.

प्यू रिसर्च सेंटरचे हे आकडे लोकसंख्येच्या भविष्यातील संभाव्य बदलांचे अंदाज आहेत. प्रजननदर, मृत्युदर, स्थलांतर आणि धार्मिक ओळख यांसारख्या घटकांमुळे प्रत्यक्ष लोकसंख्येचे चित्र वेगळे असू शकते.

Comments are closed.