कालीगंजमध्ये महुआ मोईत्रा घेराव; तिच्या गाडीवर अंडी आणि दगड फेकले

कोलकाता: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी पश्चिम बंगालमधील नादिया जिह्यातील कालीगंज येथे भाजप समर्थकांच्या जमावाने आपल्या कारवर आणि ताफ्यावर दगड व अंडी फेकल्याचा आरोप केला आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य पोलिसांना आपली सुरक्षा सुनिश्चित करता आली नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. महुआ मोइत्रा यांनी गुऊवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर अनेक पोस्ट करत या घटनेची माहिती दिली. गोबरा ग्रामपंचायत परिसरात आपल्यावर हल्ला करण्यासाठी भाजपचे 80 ते 90 समर्थक जमले होते, असा आरोप त्यांनी केला. या जमावाबाबत पोलिसांना आधीपासून माहिती होती, असेही त्यांनी म्हटले आहे. महुआ मोइत्रा यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि कृष्णानगर पोलीस जिह्याला टॅग करत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे. तरीही भाजप समर्थकांचा मोठा जमाव आपल्यावर हल्ला करण्यासाठी थांबला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती, असे त्यांनी नमूद केले.

Comments are closed.