भारत अन् अफगाणिस्तानमध्ये आजपासून वनडेचा थरार; फ्रीमध्ये सामना कुठे पाहता येणार?, पाहा संपूर्ण
भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिला एकदिवसीय थेट प्रवाह: भारत आणि अफाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून (13 जून) सुरुवात होत आहे. कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर आता टीम इंडिया 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. धर्मशालाच्या निसर्गरम्य मैदानावर होणाऱ्या पहिल्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे. रोहित शर्मासह अनेक अनुभवी खेळाडूंची उपस्थिती आणि अफगाणिस्तानच्या राशिद खान, मोहम्मद नबी यांसारख्या स्टार खेळाडूंमुळे मालिकेचा रोमांच अधिक वाढला आहे.
पहिला वनडे कधी आणि कुठे? (IND vs AFG 1st ODI)
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना 13 जून रोजी धर्मशालातील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. पर्वतरांगांच्या साक्षीने खेळला जाणारा हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
सामना थेट कुठे पाहता येणार? (IND vs AFG 1st ODI Live Streaming)
भारतातील प्रेक्षकांना हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल. तसेच मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर सामना पाहू इच्छिणाऱ्यांसाठी जिओहॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा उपलब्ध असेल.
फ्रीमध्ये सामना कसा पाहाल? (IND vs AFG 1st ODI Live Streaming)
क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे हा सामना फ्रीमध्येही पाहता येणार आहे. डीडी फ्री डिश वापरणाऱ्या प्रेक्षकांना डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर भारत-अफगाणिस्तान पहिला वनडे विनामूल्य पाहता येईल. त्यामुळे कोणतेही अतिरिक्त सबस्क्रिप्शन न घेता सामन्याचा आनंद घेता येणार आहे.
भारताचा संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा आणि प्रिन्स यादव.
अफगाणिस्तानचा संघ
रहमानुल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, सेदीकुल्लाह अटल, हशमतुल्ला शाहिदी (कर्ंधर), रहमत शाह, इकराम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांगेयालिया खरोती, एएम गझनफर, बिलाल सामी, दरविश रसूली, फरीद शरीफ-मलिक-रेहमान-रेहमान, फरिद मलिक.
वनडे मालिकेचं वेळापत्रक
पहिला वनडे: 13 जून – धर्मशाला – दुपारी 1.30 वाजता
दुसरा वनडे: 15 जून – धर्मशाला – दुपारी 1.30 वाजता
तिसरा वनडे: 18 जून – दिल्ली – दुपारी 1.30 वाजता
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.