IND Vs ENG – जसप्रीत बुमराहचं ऐतिहासिक पुनरागमन; इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच हिंदुस्थानी
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच ब्रम्हास्त्र म्हणजेच जसप्रीत बुमराहच पुनरागम झालं आहे. 2023 च्या विश्वचषक फायनलनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जसप्रीतने मालिकेतील पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे.
इंग्लंडच्या डावातील 14 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने एक स्लोवर चेंडू टाकला, ज्यावर फटका मारण्याच्या नादात ब्रूकचा झेल पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने घेतला. या विकेटसह बुमराहने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या 150 बळींचा टप्पाही यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या विकेटसह जसप्रीत बुमराहच्या इंग्लंडच्या भूमीवर एकूण 31 एकदिवसीय विकेट्स पूर्ण झाल्या आहेत. या कामगिरीसह त्याने रवींद्र जडेजाचा 30 विकेट्सचा जुना विक्रम मोडीत काढला आणि इंग्लंडमध्ये हिंदुस्थानसाठी सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. या यादीत भुवनेश्वर कुमार 28 विकेटसह तिसऱ्या, मदन लाल 27 विकेटसह चौथ्या आणि मोहम्मद शमी 26 विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहेत,
Comments are closed.