आमच्यावर हल्ला केल्यास पूर्वीपेक्षा अधिक भयंकर प्रत्युत्तर देऊ, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इराणला इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. “जर इराणने इस्रायलवर कोणताही हल्ला केला, तर त्याला मागील वेळेपेक्षा अधिक भयंकर आणि विनाशकारी प्रत्युत्तर दिले जाईल,” असे नेतन्याहू म्हणाले आहेत. दक्षिण इस्रायलमधील दिमोना शहरात आयोजित नेगेव्ह परिषदेत बोलताना त्यांनी ही आक्रमक भूमिका मांडली. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

नेतन्याहू म्हणाले आहेत की, “मी इराणच्या नेत्यांना सांगू इच्छितो की, जर तुम्ही आमच्यावर हल्ला केला तर आम्ही शांत बसू, अशी अपेक्षा मुळीच करू नका. तसेच पूर्वीसारखेच प्रत्युत्तर मिळेल या भ्रमातही राहू नका. आमचे आधीचे प्रत्युत्तर पुरेसे ताकदवान होते, पण आता आमच्या वाटेला गेल्यास मिळणारे उत्तर पूर्णपणे वेगळे आणि कितीतरी पटींनी अधिक शक्तिशाली असेल.”

दरम्यान, जूनमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये शांतता कराराबाबत एक प्राथमिक सामंजस्य करार झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेत इराण किंवा त्यांच्या समर्थक गटांनी इस्रायलला लक्ष्य करू नये, यासाठी नेतन्याहू यांनी हा कडक इशारा दिल्याचे मानले जात आहे.

Comments are closed.