IND VS NZ पहिला कसोटी सामना अनिर्णीत; मोहम्मद सिराजला का खेळवलं नाही? कर्णधाराने सांगितलं कारण
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये खेळला गेलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत सुटला. मात्र, या सामन्याच्या पहिल्या दिवासापासून टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचं नाव जोरदार चर्चेत होतं. संघातून वगळल्याने माजी खेळाडूंसह काँग्रेसच्या काही नेत्यांनीही यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. आता सामना अनिर्णीत सुटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना कर्णधार शुभमन गिलने यासंदर्भात भाष्य केलं आहे.
शुभमन गिल सिराजबद्दल म्हणाला की, “सिराज माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याला संघातून वगळणे हा एक खूप कठीण निर्णय होता. आम्ही एकत्र खूप क्रिकेट खेळलो आहोत आणि मी त्याला त्याच्या सुरुवातीच्या काळापासून ओळखतो. मी कसोटीपूर्वी त्याच्याशी बोललो आणि त्याला निर्णय समजावून सांगितला, आणि तो समजून घेतला. बघा, प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत एक वेळ अशी येते जेव्हा तो सर्वोत्तम कामगिरी करत नसतो, आणि आम्ही खेळाडूंची निवड त्यांच्या सध्याच्या फॉर्मच्या आधारावर केली आहे.” असं गिल म्हणाला. त्यामुळे पुढील सामन्याता सिराज मैदानात उतरणार का नाही? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान सामन्याचा विचार करता, पहिल्या डावात न्यूझीलंडचा संघ 368 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा करत आपला पहिला डाव 9 गड्यांच्या मोबदल्यात 720 धावांवर घोषित केला. तर न्यूझीलंड आपल्या दुसऱ्या डावात पाचवा दिवस संपेपर्यंत पाच गडी गमावून 239 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला आणि त्यामुळे सामना अनिर्णीत सुटला. आता टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना 27 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हलवर खेळला जाणार आहे.
Comments are closed.