IND vs SL दुसरी कसोटी – नाणेफेक जिंकुन हिंदुस्थानचा पहिला फलंदाजीचा निर्णय; कुलदीप यादव 'आऊट', सरांश जैन 'इन'
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅले येथील पहिल्या कसोटीत 165 धावांनी दमदार विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेल्या हिंदुस्थानी संघात या सामन्यासाठी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. फिरकीपटू कुलदीप यादव याला आजारपणामुळे विश्रांती देण्यात आली असून मध्य प्रदेशच्या 33 वर्षीय सारांश जैन याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे.
वर एक नजर #TeamIndiaची प्लेइंग इलेव्हन 2 रा #SLvIND चाचणी 👌👌
सरांश जैन आंतरराष्ट्रीय पदार्पण करत आहे 👏👏
अपडेट्स ▶️ https://t.co/r9FgXSdsMf pic.twitter.com/WOCtWZ9YcP
— BCCI (@BCCI) 23 ऑगस्ट 2026
Comments are closed.