IND Vs ZIM – वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानचा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाजी करत इतिहास रचला आहे. वैभवने आपल्या नेहमीच्या अंदाजात फटकेबाजी करत 49 चंडूंमध्ये 81 धावांची जिगरबाज खेळी केली. अवघ्या 19 धावांनी त्यांच शतक हुकलं. वैभवच हे अर्धशतक त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधलं दुसर अर्धशतक ठरलं आहे.

वैभवने झिम्बाब्वेविरुद्धच्या या अर्धशतकासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 व्या वर्षी दोन वेळा अर्धशतक झळकावण्याचा अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. या सामन्यात वैभवने 31 चेंडूत अर्धशतक झळकावले. तर 49 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 81 चोपून काढल्या. मात्र दुर्दैवाने अवघ्या 19 धावांनी त्याने शतक हुकले. याआधी या मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने 19 चेंडूंमध्ये 50 धावांची वादळी खेळी केली होती. वैभव सूर्यवंशीच्या या दणदणीत खेळीच्या बळावर हिंदुस्थानचा संघ सामन्यात अत्यंत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. आधीच 2-0 अशी आघाडी घेतलेली टीम इंडिया या विजयासह झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे.

Comments are closed.