श्रीलंका दौऱ्याआधी टीम इंडियात अचानक बदल, केकेआरच्या खेळाडूची लागली लॉटरी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरुवारी ‘इंडिया-ए’ (India-A) संघात एका महत्त्वपूर्ण बदलाची घोषणा केली. श्रीलंकेत होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेसाठी ‘इंडिया-ए’ संघात, अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेल्या अष्टपैलू खेळाडू अनूकुल रॉयची निवड करण्यात आली आहे. तो सध्या आयपीएल २०२६ च्या हंगामात ‘कोलकाता नाईट रायडर्स’ संघाकडून खेळत आहे.
बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, फिरकी गोलंदाज-अष्टपैलू हर्ष दुबेच्या जागी अनूकुल रॉयचा संघात समावेश करण्यात आला आहे. हर्ष दुबेची निवड अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी आणि एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय वरिष्ठ संघात करण्यात आली आहे.
श्रीलंकेतील ‘इंडिया-ए’ ची तिरंगी मालिका आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिका या दोन्ही एकाच कालावधीत नियोजित असल्याने, खेळाडूंना या दोन मालिकांपैकी केवळ एकाच मालिकेत सहभागी होता येते.
‘इंडिया-ए’, ‘श्रीलंका-ए’ आणि ‘अफगाणिस्तान-ए’ या संघांचा समावेश असलेली ही तिरंगी मालिका श्रीलंकेत ९ जून ते २१ जून या कालावधीत खेळली जाणार आहे. दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिका ज्यामध्ये एक कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. भारतात ६ जून ते २० जून या काळात आयोजित केली जाईल.
तिरंगी मालिकेसाठी ‘इंडिया-ए’चा अद्ययावत संघ:
तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), विपराज निगम, यश ठाकूर, युद्धवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान आणि अनूकुल रॉय.
आयपीएल २०२६ मधील अनूकुल रॉयची कामगिरी
अनूकुल रॉयने या चालू हंगामात १३ सामने खेळले आहेत. ११ डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने ८ विकेट्स मिळवले आहेत. यामध्ये २/३१ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. फलंदाजीच्या आघाडीवर, त्याने ६ डावांमध्ये एकूण ४३ धावा केल्या असून, २९ (नाबाद) ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
तिरंगी मालिकेचे वेळापत्रक
९ जून: भारत-अ विरुद्ध श्रीलंका-अ
११ जून: भारत-अ विरुद्ध अफगाणिस्तान-अ
१३ जून: अफगाणिस्तान-अ विरुद्ध श्रीलंका-अ
१५ जून: भारत-अ विरुद्ध श्रीलंका-अ
१७ जून: भारत-अ विरुद्ध अफगाणिस्तान-अ
१९ जून: अफगाणिस्तान-अ विरुद्ध श्रीलंका-अ
21 जून: अंतिम सामना
Comments are closed.