एक वर्ल्ड कप… 6 वनडे, 6 टी-20, 3 कसोटी मालिकेचा थरार! 2026 मधील भारतीय संघाचे संपूर्ण कॅलेंडर

भारत क्रिकेट 2026 वेळापत्रक बातम्या : साल 2025 मागे राहिले, पण क्रिकेट प्रेमी आता 2026 मध्ये सुरू होणाऱ्या धमाकेदार क्रिकेटच्या रोमांचासाठी सज्ज आहेत. गेल्या वर्षी, भारतीय टीमने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली, तर विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांनी कसोटी क्रिकेटला निरोप दिला, ज्यामुळे चाहते भावनिक झाले. आता टीम इंडिया नव्या वर्षासोबत नव्या उमेदीने आणि उत्साहाने मैदानात उतरायला सज्ज आहे. नवीन वर्ष 2026 भारतीय क्रिकेटसाठी प्रचंड रोमांच घेऊन येणार आहे. टीम इंडिया वर्षाच्या सुरुवातीपासूनच मोठ्या टूर्नामेंट्स आणि आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये हजेरी लावणार आहे. वर्षाची सुरुवातच न्यूजीलंडविरुद्ध 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेने होणार आहे, जी 11 जानेवारी 2026 पासून सुरू होईल.

IND vs NZ ODI आणि T20I मालिका शेड्यूल

ODI मालिका :

  • 11 जानेवारी: पहिला ODI – वडोदरा
  • 14 जानेवारी: दुसरा ODI – राजकोट
  • 18 जानेवारी: तिसरा ODI – इंदौर

T20I मालिका :

  • 21 जानेवारी: पहिला T20I – नागपूर
  • 23 जानेवारी: दुसरा T20I – रायपूर
  • 25 जानेवारी: तिसरा T20I – गुवाहाटी
  • 28 जानेवारी: चौथा T20I – विशाखापट्टणम
  • 31 जानेवारी: पाचवा T20I – तिरुवनंतपुरम

T20 विश्वचषक 2026 मिशन

फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. टूर्नामेंट 7 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 8 मार्चला फायनल खेळले जाईल.

ग्रुप स्टेजमध्ये भारताचे सामने :

  • 7 फेब्रुवारी: भारत vs USA – मुंबई
  • १२ फेब्रुवारी: भारत विरुद्ध नामिबिया – दिल्ली
  • 15 फेब्रुवारी: भारत vs पाकिस्तान – कोलंबो
  • 18 फेब्रुवारी: भारत vs नीदरलँड – अहमदाबाद

सुपर-8 आणि नॉकआउट सामने 21 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत खेळले जातील.

जून 2026: अफगाणिस्तानचा भारत दौरा – 3 ODI + 1 कसोटी

जुलै 2026 : भारत इंग्लंड दौऱ्यावर – 5 T20 + 3 ODI (ODI वर्ल्ड कप 2027 तयारीसाठी महत्वाचा)

टी20I मालिका शेड्यूल :

  • 1 जुलै: डरहम
  • 4 जुलै : मॅनचेस्टर
  • ७ जुलै : नॉटिंगहॅम
  • ९ जुलै: ब्रिस्टल
  • 11 जुलै : साउथॅम्प्टन

ODI मालिका शेड्यूल :

  • 14 जुलै : बर्मिंगहॅम
  • 16 जुलै : कार्डिफ
  • 19 जुलै : लंडन (लॉर्ड्स)

ऑगस्ट 2026 : भारताचा श्रीलंका दौरा – 2 कसोटी

सप्टेंबर 2026 : न्यूट्रल वेन्यूवर अफगाणिस्तानविरुद्ध 3 T20I

सप्टेंबर–ऑक्टोबर 2026 : वेस्ट इंडीजचा भारत दौरा – 3 ODI + 5 T20I

ऑक्टोबर–नोव्हेंबर 2026 : भारताचा न्यूजीलंड दौरा – 2 कसोटी + 3 ODI + 5 T20I

डिसेंबर 2026 : भारताचा श्रीलंका दौरा – 3 ODI + 3 T20I

हे ही वाचा –

Damien Martyn Hospitali : क्रिकेटविश्व सुन्न! ज्याच्यामुळे 2003 च्या फायनलमध्ये भारताचं स्वप्न भंगलं, तोच दिग्गज खेळाडू मरणाच्या दारात, दुर्धर आजारामुळे ऑस्ट्रेलियाचा डेमियन मार्टिन कोमात

आणखी वाचा

Comments are closed.