IND vs ZIM: भारताची 3-0 अशी एकतर्फी बाजी! कर्णधार श्रेयस अय्यरचा पहिला ऐतिहासिक मालिका विजय
भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघान झिम्बाब्वेचा 3-0 ने सुपडा साफ केला आहे. मालिकेतील तिसरा सामना हरारेतील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने 192 धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेने पूर्ण जोर लावला. पण झिम्बाब्वेचा संघ विजयापासून 35 धावा दूर राहिला. यासह भारतीय संघाने ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर केली. हा श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिलाच मालिका विजय आहे.
सूर्युकमार यादवला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर ही जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली होती. पण, श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करू शकला नव्हता . आयर्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला 2-0 ने लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताला 4-0 ने पराभव पत्कारावा लागला. यासह लागोपाठ 2 टी-20 मालिका गमावणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. पण अखेर झिम्बाब्वेत त्याने कर्णधार म्हणून पहिली मालिका जिंकली आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. अभिषेक शर्मा अवघ्या 2 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर इशान किशन आणि वैभव सूर्यवंशीने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. इशान किशनने 29 धावांचे योगदान दिले. तर श्रेयस अय्यरने 27 धावांचे योगदान दिले. वैभव सूर्यवंशीकडे शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. पण तो 81 धावा करुन माघारी परतला. शेवटी रिंकू सिंगने 25 धावांची खेळी करून भारतीय संघाची धावसंख्या 5 गडी बाद 1
192 धावांवर पोहोचवली.
झिम्बाब्वेला हा सामना जिंकण्यासाठी 193 धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना बेन करनने 20 धावांची खेळी केली. तर डिओने मेयर्सने 19, मधेवेरेने 28 धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेकडून रायन बर्लने शेवटपर्यंत झुंज दिली. त्याने दमदार अर्धशतक झळकावलं. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मयांक यादवने 3, यश ठाकूरने 2 आणि अशोक शर्मा, रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.
Comments are closed.