Uber Cup Finals – हिंदुस्थानचे आव्हान संपुष्टात!
दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला मजबूत स्थितीचा फायदा उठवता आला नाही, तर इतर खेळाडूंनाही निर्णायक क्षणी प्रभावी खेळ करता आला नाही. त्यामुळे हिंदुस्थानला उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत 16 वेळच्या विजेत्या चीनकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. उबेर चषकामध्ये हिंदुस्थानला चीनविरुद्ध सलग तिसऱ्यांदा हार पत्करावी लागली. पहिल्या एकेरीत पी. व्ही. सिंधूने निर्णायक गेममध्ये 18-12 अशी आघाडी घेतली होती, मात्र ती टिकवण्यात अपयशी ठरली आणि जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानावरील वांग झियीकडून 16-21, 21-19, 19-21 अशी हार पत्करली.
पराभवातून खूप शिकलो
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत 1-4 असा पराभव पत्करावा लागला असला तरी हिंदुस्थान महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी या दौऱ्याला ‘मोठा शिकण्याचा टप्पा’ ठरवले. सुरुवातीचे तीन सामने गमावून संघ दबावाखाली गेला, चौथ्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले, मात्र अखेरचा सामना 23 धावांनी गमावत मालिका हातची गेली. ही मालिका अत्यंत स्पर्धात्मक होती. दक्षिण आफ्रिकेत खेळणे नेहमीच कठीण असते. निकाल आपल्या बाजूने आला नाही, पण शिकायला भरपूर मिळाले,’ असे मुझुमदार यांनी स्पष्टपणे सांगितले. 4-1 हा निकाल निराशाजनक असला तरी संघ योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इंग्लंडचा महिला संघ जाहीर
इंग्लंड महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला टी–20 विश्वचषक 2026 साठी 15 जणींचा दमदार संघ जाहीर करत घरच्या मैदानावरच विजेतेपद जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने घोषित केलेल्या या संघाची धुरा अनुभवी नॅट स्किव्हर-ब्रंटकडे सोपवण्यात आली असून ती आपल्या सातव्या टी-20 विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणार आहेत.
इंग्लंड महिला संघ
नॅट स्किव्हर-ब्रँट (कर्णधार), लॉरेन बेल, एलिस पॅप्सी, टिली कोर्टिन-कोलमन, चार्ली डीन (उप-कर्णधार), सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फिलर, डॅनी गिब्सन, एमी जोन्स (स्टिक गार्ड), फ्रेया केम्प, हीदर नाइट, डॅन्सी, डॅन्सी, डॅन्सी, डॅनी.
Comments are closed.