IPL 2026: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी बनला रन मशीन, दिग्गजांना टाकलं मागे
आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशीचा धमाकेदार फाॅर्म पाहायला मिळाला आहे. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी सध्या सर्व चर्चांचा केंद्रबिंदू बनला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात, त्याने अवघ्या १६ चेंडूंमध्ये ४३ धावांची धडाकेबाज खेळी करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या खेळीमध्ये ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.
या कामगिरीच्या जोरावर, वैभव चालू हंगामात ४०० धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला खेळाडू ठरला आणि त्याने ऑरेंज कॅपवर आपले नाव केले आहे. त्याने अभिषेक शर्माला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले, तर केएल राहुल एका स्थानाने खाली घसरला.
याव्यतिरिक्त, वैभवने आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. एकाच आयपीएल हंगामात ४०० धावा पूर्ण करण्याचा पराक्रम त्याने सर्वात कमी चेंडूंमध्ये साध्य केला आहे. आंद्रे रसेलचा विक्रम मोडून त्याने एक नवीन इतिहास रचला आहे.
एका आयपीएल हंगामात सर्वात जलद ४०० धावा (चेंडूंनुसार)
१६७ – वैभव सूर्यवंशी (२०२६)
188 – आंद्रे रसेल (2019)
195 – अभिषेक शर्मा (2024)
197 – निकोलस पूरन (2025)
२०० – ग्लेन मॅक्सवेल (२०१४)
दरम्यान, २८ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवर ६ गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह, राजस्थान संघाने गुणतालिकेतील तिसऱ्या स्थानावरील आपली पकड अधिकच मजबूत केली आहे.
जरी पंजाब किंग्ज १३ गुणांसह अजूनही अव्वल स्थानी कायम असला, तरी राजस्थानने त्यांच्याशी असलेली गुणांची तफावत कमी केली असून १२ गुणांचा टप्पा गाठला आहे. परिणामी, अव्वल तीन संघांमधील स्पर्धा आणखीच तीव्र झाली आहे.
Comments are closed.