मोठी बातमी : संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, मस्साजोगच्या निवडणुकीत मोठा उलटफेर!
बीड : बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीमध्ये 84 टक्के मतदान झाले असून आज सकाळी दहा वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सरपंच पद रिक्त झाले होते. त्यानंतर ही निवडणूक झाली असून यामध्ये आश्विनी देशमुख यांच्यासमोर स्वरूपानंद देशमुख यांनी आव्हान निर्माण केलेले होते. आज झालेल्या मतदानात गावातील 2 हजार 84 मतदारांपैकी 1 हजार 744 मतदारांनी आपला हक्क बजावला. आता समोर आलेल्या निकालानुसार संतोष देशमुखांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मस्साजोग ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांना कौल दिला आहे. 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले आहेत. तर दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे. (Massajog Election Result)
बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया 28 एप्रिलला पार पडली. या निवडणुकीमध्ये 84 टक्के मतदान झाले होते. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सरपंच पद रिक्त झाले होते. त्यानंतर ही निवडणूक होत असून यामध्ये आश्विनी देशमुख यांच्यासमोर स्वरूपानंद देशमुख यांनी आव्हान निर्माण केले होते. काल झालेल्या मतदानात गावातील 2 हजार 84 मतदारांपैकी 1 हजार 744 मतदारांनी आपला हक्क बजावला होता.
आणखी वाचा
Comments are closed.