IPL 2026: ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढली? रियान परागचा व्हिडीओ व्हायरल, अडचणीत वाढ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान पराग याचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चंदीगड येथे पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान, रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये ‘व्हेपिंग’ (ई-सिगारेट ओढणे) करताना कॅमेऱ्यात कैद झाला. मॅचदरम्यान कॅमेरा राजस्थान रॉयल्सच्या ड्रेसिंग रुमकडे वळविण्यात आल्यानंतर हा प्रकार लाईव्ह दिसला आहे.

मंगळवारी पंजाब किंग्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाबचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात रियान पराग १६ चेंडूत २९ धावा करून बाद झाला व ड्रेसिंग रूममध्ये परतला. याच दरम्यान ब्रॉडकास्ट कॅमेरा अचानक राजस्थान रॉयल्सच्या ड्रेसिंग रूमकडे वळला. त्यावेळी रियान परागच्या हातात ‘व्हेप’ (Vape) सारखी वस्तू दिसली आणि  तो त्या वस्तूचा वापर करत आहे असेही आढळले. रियान परागच्या या कृत्यामुळे सध्या त्याच्यावर जोरदार टीका होत आहे.

आयपीएलच्या नियमांनुसार खेळाडूंना मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्ये आचारसंहितेचे पालन करावे लागते. यापूर्वीही रियान पराग त्याच्या मैदानातील वर्तणुकीमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे वादात राहिला आहे. आता या ताज्या वादामुळे राजस्थान रॉयल्स व्यवस्थापन त्याच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.