एम्बाप्पे जखमी; माद्रिदला धक्का, फ्रान्सची वर्ल्ड कप चिंता वाढली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

किलियन एम्बाप्पेच्या दुखापतीने रिअल माद्रिदला जबरदस्त धक्का बसला आहे. हंगामाच्या अखेरीस निर्णायक टप्प्यावर असताना संघाचा सर्वात आक्रमक खेळाडू मैदानाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर त्याची दुखापत इतकी गंभीर आहे की आगामी वर्ल्ड कपपूर्वी फिट होण्याबाबतही साशंकता व्यक्त केली जात असल्यामुळे फ्रान्सच्या गोटातही चिंतेचे वातावरण पसरले आहे.

काल रात्री उशीरा रिअल बेटिसविरुद्ध 1-1 अशा बरोबरीत सुटलेल्या सामन्यात ही दुर्घटना घडली. सामना संपण्यास अवघे दहा मिनिटे बाकी असताना एम्बाप्पेला मैदान सोडावे लागले. त्या वेळी माद्रिद 1-0 ने आघाडीवर होता; मात्र अखेरच्या क्षणी हेक्टर बेलेरिनच्या गोलने विजय हातातून निसटला आणि त्यातच एम्बाप्पेच्या दुखापतीने संघावर दुहेरी आघात झाला.

वैद्यकीय तपासणीत डाव्या पायातील सेमिटेंडिनोसस स्नायूला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. क्लबने पुनरागमनाबाबत कोणतीही ठोस वेळमर्यादा दिलेली नाही, त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीची भीती अधिकच गडद झाली आहे. या दुखापतीमुळे 10 मे रोजी बार्सिलोनाविरुद्धच्या महासामन्यासह उर्वरित पाच सामने एम्बाप्पे गमावू शकतो. त्यामुळे माद्रिदच्या किताबाच्या आशांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एम्बाप्पे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये होता. या हंगामात त्याने 24 गोल झळकावले होते.

Comments are closed.