कलिंगड खाऊन कुटुंबातील ‘त्या’ मृत्यूंचे गूढ गडद! अन्नातून विषबाधा की आणखी काही? डॉक्टरांच्या वि

मुंबई : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. विषारी अथवा रासायनिक पदार्थामुळे मृत्यू झाल्याच्या शक्यतेची डॉक्टरांकडून तपासणी सुरू आहे. कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील चौघांच्या (Dokadia Family Pydhonie) मृत्यूच गूढं अधिकच वाढलं आहे. अन्नातून झालेल्या सामान्य विषबाधेच हे प्रकरण नसल्याचं डॉक्टरांचं मत आहे.  चौघांची स्थिती ही अन्नातून होणाऱ्या विधबाधेपेक्षा खूपच खराब होती असं डॉक्टरांचं म्हणण आहे. अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे एवढ्या जलद गतीने आणि एवढी गंभीर स्वरूपात प्रकृती खालावत नसल्याचं मत देखील डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.(Dokadia Family Pydhonie)

तर मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सुरवातीला उलट्या सुरू झाल्या त्यानंतर त्यांची न्यूरोलॉजिकल स्थिती खालावत गेली आणि त्याची शुद्ध हरपली आणि काही तासातच चौघांचा मृत्यू झाला. पोलीस न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. तर शनिवारी रात्री घरातील मेजवानीनंतर पायधुणीला राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबीयांनी कलिंगड खाल्लं होतं आणि त्यानंतर चौघांचाही मृत्यू झाला होता.(Dokadia Family Pydhonie)

मुंबईतील ज्या दुकानात कलिंगड खाल्ल्याने ४ जणांचा मृत्यू झाला, तिथे एबीपी न्यूज पोहोचले. दुकानदाराने सांगितले की, यात त्यांच्या कलिंगडचा दोष नाही आणि त्यांना दुकान बंद करावे लागले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या मुलाची चौकशी सुरू आहे. नाल बाजारमध्ये मोहम्मद यांचे कलिंगडचे दुकान आहे, जिथे आता कलिंगड झाकून ठेवले आहेत आणि ४ जणांच्या मृत्यूची बातमी आल्यापासून दुकान बंद आहे. दुकानदाराचे वडील म्हणाले की, आम्ही अनेक वर्षांपासून कलिंगड विकत आहोत आणि कधीही कोणतीही तक्रार आली नाही, यात आमचा दोष नाही, या प्रकरणाला उगाचच मोठे स्वरूप देण्यात आले आहे, या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे.

मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला कलिंगड खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, परंतु शवविच्छेदनादरम्यान (Postmortem) मृतांच्या शरीरात ‘पेन किलर’ (वेदनानाशक) सदृश्य संशयास्पद घटक आढळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलींचा रविवारी जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या कुटुंबाने रात्रीच्या मेजवानीत आधी बिर्याणी आणि नंतर कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर काही तासांतच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनादरम्यान शरीरात काही वेदनानाशक औषधांचे घटक आढळले आहेत. रुग्णालय प्रशासनाने अद्याप अधिकृत पुष्टी केली नसली तरी, यामुळे मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) डोकाडिया यांच्या घरातून ११ प्रकारचे नमुने जप्त केले आहेत. यामध्ये बिर्याणी, कलिंगड, माठातील पाणी, शिजवलेला आणि कच्चा भात, चिकन, खजूर आणि मसाल्यांचा समावेश आहे. केवळ अन्नातून होणाऱ्या सामान्य विषबाधेमुळे इतक्या वेगाने मृत्यू होणे दुर्मीळ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी आता घातपाताच्या अँगलनेही तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोन जप्त केले असून, त्यांच्या बँक व्यवहारांची आणि संशयास्पद संपर्कांची चौकशी सुरू केली आहे.

Watermelon Death Mumbai : मृतांच्या शरीरात आढळला हादरवणारा पदार्थ

मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील (Dokadia Family Pydhonie) चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना (Watermelon Death Mumbai) समोर आली होती. या प्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात मृतांच्या शरीरात “पेनकिलर-सदृश” (वेदनाशामकासारखा) पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टेमदरम्यान हा संशयित पदार्थ आढळल्याची माहिती मिळत असली तरी रुग्णालय प्रशासनाने याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. (Watermelon Death Mumbai)

Watermelon Death Mumbai : सामान्य अन्नदूषिततेमुळे इतक्या वेगाने मृत्यू होणे दुर्मिळ

सदर घटनेत आई-वडील आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असून, रविवारी उपचारादरम्यान जेजे रुग्णालय येथे त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक निष्कर्षांनुसार अन्न विषबाधेची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सामान्य अन्नदूषिततेमुळे इतक्या वेगाने मृत्यू होणे दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणात विषारी घटक किंवा इतर कारणांचा समावेश असण्याची शक्यता तपासली जात असून, फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. (Watermelon Death Mumbai)

Watermelon Death Mumbai : अन्न व औषध प्रशासनने स्वतंत्र तपास केला सुरू

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन (FDA) ने स्वतंत्र तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या घरातून 11 नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. यात बिर्याणी, कलिंगड (टरबूज), माठातील व फ्रिजमधील पाणी, कच्चा व शिजवलेला भात, कच्चे व शिजवलेले चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश आहे. अन्न निरीक्षकांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोनही जप्त केले असून कोणतेही संशयास्पद संपर्क होते का, याची चौकशी सुरू आहे. तसेच कुटुंबप्रमुख अब्दुल्ला डोकाडिया यांच्या व्यावसायिक व्यवहारांबाबत आणि बँक व्यवहारांबाबतही तपास सुरू आहे.

Watermelon Death Mumbai : नेमकं प्रकरण काय?

डोकाडिया कुटुंबीयांनी 25 एप्रिल रोजी रात्री कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर 26 एप्रिलला त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यानंतर चौघांनाही तात्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. सदर घटनेमुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.