टी-20 वर्ल्ड कप 2026साठी या दिवशी होणार संघ जाहीर, न्यूझीलंड दौऱ्यासाठीही BCCI चा मोठा निर्णय
भारतीय संघ T20 विश्वचषक 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी टीम इंडियाच्या घोषणेबाबत मोठी आणि अधिकृत अपडेट समोर आला आहे. बीसीसीआयने याबाबत प्रेस रिलीज जारी करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. बीसीसीआयनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2026 तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड 20 डिसेंबर रोजी केली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात पार पडणार आहे.
टीम इंडियाची घोषणा कधी आणि कुठे? (When and where will Team India be announced)
टी-20 वर्ल्ड कप 2026 आणि न्यूझीलंड सीरिजसाठी टीम इंडियाची अधिकृत घोषणा 20 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता होणार आहे. संघनिवडीनंतर टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन संघाबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. या स्पर्धेआधी भारतीय संघासमोर काही मोठी आव्हाने आहेत. विशेषतः कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांच्या फॉर्मबाबत चर्चांना उधाण आले आहे.
कोणाकोणाला मिळणार संधी?
वर्ल्ड कपसाठी जाहीर होणाऱ्या संघात यशस्वी जैस्वालला संधी मिळणार का? हा मोठा प्रश्न आहे. तसेच विकेटकीपर म्हणून भारत संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांच्यावर विश्वास ठेवणार की ईशान किशन आणि ऋषभ पंत यांची संघात पुनरागमन होणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 20 डिसेंबरला होणारी ही घोषणा भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार असून, टीम इंडियाची वर्ल्ड कपमधील दिशा याच निवडीतून स्पष्ट होणार आहे.
भारताचा संभाव्य संघ (India Squad T20 World Cup 2026) :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड वेळापत्रक?
भारत न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर व्हाईट-बॉल मालिका खेळणार आहे. ही मालिका 2026 च्या टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी होईल. या मालिकेत तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने असतील. एकदिवसीय मालिका 11,14 आणि 18 जानेवारी रोजी वडोदरा, राजकोट आणि इंदूर येथे खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांनी सुरू होईल.
एकदिवसीय मालिकेनंतर, 21 ते 31 जानेवारी दरम्यान पाच टी-20 सामने नागपूरमध्ये सुरू होतील. दुसरा टी-20 सामना 23 जानेवारी रोजी रायपूरमध्ये खेळला जाईल. तिसरा सामना 25 जानेवारी रोजी गुवाहाटीमध्ये होणार आहे. चौथा टी-20 सामना 28 जानेवारी रोजी विजागमध्ये खेळला जाईल, तर शेवटचा टी-20 सामना 31 जानेवारी रोजी तिरुवनंतपुरममध्ये खेळला जाईल.
2026 चा टी-20 विश्वचषक कधी सुरू होईल?
2026 चा टी-20 विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 8 मार्चपर्यंत चालेल. ही आयसीसी स्पर्धा भारत आणि श्रीलंका आयोजित करत आहेत. त्यामुळे, या स्पर्धेत भारतीय संघ एक प्रबळ दावेदार असेल. पण, स्पर्धेपूर्वी, भारतीय संघासमोर काही प्रश्न आहेत जे संघ निवडीमध्ये सोडवावे लागतील.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.