भारत जागतिक जहाजबांधणी केंद्र बनणार आहे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत जागतिक नौका बांधणी केंद्र बनण्यासाठी सज्ज होत आहे. यासाठी दक्षिण कोरियाशी करार केला जाणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रगती करण्याची योजना असून या योजनेत दक्षिण कोरियाचे भारताला पूर्ण साहाय्य मिळण्याची शक्यता आहे. या देशाचे राष्ट्रपती ली जे म्युंग या आठवड्यात भारताचा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात या संदर्भात मोठे करार केले जाण्याची शक्यता आहे.
कोचीन शिपयार्ड लिमिटेड आणि दक्षिण कोरियाची कंपनी ह्युंदाई हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यात नौकाबांधणीच्या संदर्भात एक करार करण्यात आला आहे. या करारामुळे देशाचे सागरी सामर्ध्य अधिक वाढणार आहे. भारत दक्षिण कोरियाच्या सहकार्याने नौका बांधणी क्षेत्रात मोठी उडी घेण्यासाठी सज्ज होत असून हा करार त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अध्यक्ष म्युंग यांच्यासह दक्षिण कोरियातील 200 मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधीही भारतात येत असून दोन्ही देशांमधील तंत्रवैज्ञानिक सहकार्य वाढविण्यासंबंधी महत्वाचे करार केले जातील, अशी माहिती देण्यात आली. व्यापार, गुंतवणूक, सेमीकंडक्टर निर्मिती, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान विकास, नव्या तंत्रज्ञानाचा विकास आदी संदर्भात महत्वाचे करार पेले जाणे शक्य आहे.
Comments are closed.