IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल होणार! BCCI आणि ACB मधील चर्चेचं नेमकं कारण काय?

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) दोन्ही संघात सप्टेंबरमध्ये 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आलं आहे, पण आता यामध्ये बदल होऊ शकतो. याविषयी बीसीसीआय (BCCI) आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (ACB) दरम्यान बातचीत सुरू आहे. लवकरच बदलाची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा आहे. या तारखांमध्ये थोडाफेरबदल केला जाऊ शकतो.
पुढच्या महिन्यात अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दरम्यान टी-20 सामने खेळवले जातील. मालिका भारतात असेल, पण ती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड होस्ट करत आहे. मालिकेचे तिन्ही सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील. दरम्यान रिपोर्ट्सनुसार, एसीबी म्हणजेच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करू इच्छितो, जेणेकरून गणेश चतुर्थीच्या दिवशीही एक सामना खेळवला जाऊ शकेल, जो की 14 सप्टेंबरला आहे. आधी घोषणा केली गेली होती की, पहिला सामना 13 सप्टेंबरला होईल, दुसरा सामना 15 आणि तिसरा 17 सप्टेंबरला खेळवला जाईल. पण आता पहिला सामना 11 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. दुसरा सामना 13 आणि तिसरा 14 सप्टेंबरला करण्याविषयी बोलणी सुरू आहेत.
महत्वाचं म्हणजे, गणेश चतुर्थीच्या दिवशी चांगले सणाचे वातावरण असेल, त्यामुळे लोक मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येऊ शकतात. एसीबीने याविषयी बीसीसीआयशी बोलणे केले आहे आणि यात जास्त अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे. टीम इंडिया सध्या श्रीलंकाच्या दौऱ्यावर आहे, जिथे 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. ही मालिका 27 ऑगस्टला संपेल. त्यानंतर लवकर भारतीय संघाचं कोणतंही असं वेळापत्रक नाही. त्यामुळे बदलामध्ये जास्त अडचण येणार नाही.
24 सप्टेंबरपासून एशियन गेम्स सुरू होतील, तोपर्यंत मालिका संपून जाईल. याआधी अफगाणिस्तानने भारतात एक कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली होती, त्याचे होस्टिंग सुद्धा अफगाणिस्तान क्रिकेटच करत होते. तेव्हा टी-20 मालिका राहिली होती, जी आता खेळवली जाईल. मालिका एशियन गेम्ससाठी खूप महत्त्वाची असेल आणि खेळाडूंना तयारीची संधी मिळून जाईल. लवकरच बदल झालेले वेळापत्रक समोर येईल. त्यानंतर भारतीय संघाचं स्क्वॉड सुद्धा जाहीर केलं जाईल. त्यामुळे, अपेक्षा आहे की श्रेयस अय्यरचं (Shreyas Iyer) टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसेल.
Comments are closed.