टीम इंडियाने आणखी एक मालिका गमावली! निर्णायक सामन्यात द्रविडच्या मुलाला डच्चू, श्रीलंकेने 1 विक

भारत अंडर 19 विरुद्ध श्रीलंका अंडर 19 3रा युवा एकदिवसीय : भारतीय 19 वर्षांखालील क्रिकेट संघाला श्रीलंका दौऱ्यावर एका मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तीन सामन्यांच्या युवा एकदिवसीय मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात श्रीलंकेने भारतावर 1 गडी राखून थरारक विजय मिळवला. या विजयासोबतच श्रीलंकेने ही मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. भारतासाठी हा पराभव जितका धक्कादायक होता, तितकाच संघ व्यवस्थापनाचा एक निर्णयही चर्चेचा विषय ठरला आहे.

द्रविडच्या मुलाला बाहेर बसवण्याची चूक

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार आणि राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याने 87 धावांची खेळी केली होती. फॉर्ममध्ये असूनही, या अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्याचा अजब निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. भारताची हीच चूक अखेर पराभवाचे मुख्य कारण ठरली, अशी जोरदार चर्चा आता क्रीडा जगतात रंगू लागली आहे.

व्ही. के. विनीतचे शानदार शतक

सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकांत 8 बाद 290 धावांचा आव्हानात्मक स्कोअर उभारला. भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या व्ही. के. विनीत याने शानदार फलंदाजी करत 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 131 धावांची दमदार शतकी खेळी केली. त्याला लक्ष्य राजेश रायचंदानी (61 धावा) याने चांगली साथ दिली. श्रीलंकेकडून गोलंदाजीत सेथमिका सेनेविरात्ने याने सर्वाधिक 4 बळी घेतले.

शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेचा थरारक विजय

291 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवस्था एकवेळ बिकट झाली होती, पण त्यांच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत लढा दिला. श्रीलंकेला शेवटच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज होती. क्रीजवर असलेल्या चमिका हीनातिगालाने शेवटच्या षटकातील नाट्यमय घडामोडींनंतर संघाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेसाठी सातव्या क्रमांकावर आलेल्या चमिका हीनातिगाला याने 68 चेंडूत नाबाद 84 धावांची मॅचविनिंग खेळी केली. तसेच सेनुजा वेकुनागोडाने 67 धावांचे योगदान दिले. भारताकडून अनमोलजीत सिंगने 4 गडी बाद केले, पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.

भारताने या मालिकेची सुरुवात पहिल्या सामन्यात 4 गडी राखून विजय मिळवत दणक्यात केली होती. मात्र, श्रीलंकेने त्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकले आणि ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर आता दोन्ही संघांमध्ये 2 अनधिकृत कसोटी (Youth Test) सामने खेळवले जाणार आहेत.

हे ही वाचा –

IND vs ENG ODI : इंग्लंडमध्ये पाऊल टाकताच रोहित शर्मा मिशन मोडमध्ये! टी-20ची चूक पुन्हा नाही; आता फक्त 20 धावा अन् पाकिस्तानी खेळाडूचा रेकॉर्ड धोक्यात

Comments are closed.