Inflation Rate ४४ महिन्यांमधील उच्चांकी घाऊक महागाई, जून महिन्यात 9.87 टक्के राहिले प्रमाण

►वृत्तसंस्था नवी दिल्ली
जून महिन्यात घाऊक महागाई दर वाढून ९.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा आकडा मे महिन्यात ९.६८ टक्के राहिला होता. जून महिन्यातील घाऊक महागाई दर ४४ महिन्यांमधील उच्चांकी ठरला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये घाऊक महागाई दर १०.७० टक्क्यांवर पोहोचला होता. वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी घाऊक महागाई दराचे आकडे जारी केले आहेत.

दैनंदिन गरजेची सामग्री अन् अन्नधान्य महागल्याने घाऊक महागाई दरात मोठी वाढ झाली आहे. इंधन अन् ऊर्जेचा महागाई दर घटला आहे, परंतु अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा संघर्ष पेटल्याने सर्वसामान्यांना जाणवणारी महागाईची झळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

5 Terrorist Arrested |जैशच्या ५ दहशतवाद्यांना गुजरात एटीएसकडून अटक, जगन्नाथ रथयात्रेपूर्वी तपास यंत्रणांना यश

दैनंदिन गरजेच्या सामग्रीचा महागाई दर 4.99 टक्क्यांवरून वाढत 7 टक्के झाला आहे. अन्नधान्याचा महागाई दर 4.49 टक्क्यांवरून वाढत 6.14 टक्क्यांवर पोहोचला आहे. इंधन अन् ऊर्जेचा घाऊक महागाई दर 30.33 टक्क्यांवरून घटत 27.41 टक्के झाला आहे. निर्मित उत्पादनांचा घाऊक महागाई दर मात्र स्थिर आहे. हा आकडा 7.48 टक्के राहिला आहे.

घाऊक महागाई दर दीर्घकाळापर्यंत वाढत राहिल्यास बहुतांश उत्पादन क्षेत्रावर याचा प्रतिकूल प्रभाव पडतो. घाऊक मूल्य अधिक काळापर्यंत चढे राहिल्यास उत्पादक याचा भार ग्राहकांवर टाकत असतात. सरकार केवळ शुल्काद्वारे घाऊक महागाईला नियंत्रित करू शकते.

Comments are closed.