आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानची सुवर्णपंचमी; क्रिकेट, हॉकीसह पाच ‘गोल्ड’ जिंकले! चौथ्या स्थानावर झेप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानसाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील शनिवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. क्रिकेट, हॉकीसह विविध क्रीडा प्रकारांमध्ये पाच सुवर्ण पदके जिंकत हिंदुस्थानने पंधराव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर भरारी घेतली. आजच्या कामगिरीमुळे हिंदुस्थानच्या खात्यात आतापर्यंत 21 सुवर्णपदके जमा झाली आहेत. गोल्डन कामगिरीबरोबरच हिंदुस्थानने आज दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकेही पटकावली.

महाराष्ट्राच्या लेकीने आशियाई स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करत इतिहास रचला. अमरावतीच्या 17 वर्षीय कुमकुम मोहडने तिरंदाजीत वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेतील तिचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. गोल्फमध्ये हिंदुस्थानने पहिले सुवर्णपदक मिळवले. प्रणवी शरथ उर्सने स्ट्रोक प्लेच्या चार फेऱयांमध्ये  265 गुण मिळवत सुवर्ण पटकावले.

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानवर 19 धावांनी विजय मिळवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली, तर पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानी संघाने मलेशियाचा 5-1 असा धुव्वा उडवत सुवर्ण कामगिरी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने दोन गोल केले.

  • अमन सेहरावतने 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. अंतिम सामन्यात अमनने उत्तर कोरियाचा विद्यमान विश्वविजेता हान चोंग साँग याला 11-7 ने आसमान दाखवले. पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाईल प्रकारात हिंदुस्थानचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
  • गोल्फच्या सांघिक प्रकारात हिंदुस्थानला पहिले रौप्यपदक मिळाले. कुस्तीपटू अंतिम पंघालला रौप्यवर समाधान मानावे लागले, तर दीपक पुनियाने  कांस्यपदक जिंकले. तिरंदाजीत नीरजला कांस्यपदक मिळाले.

Comments are closed.