मध्य आशियात भारताचा प्रभाव वाढला आहे.
पंतप्रधान मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर, क्षी जिनपिंग आणि पुतिन यांच्याशी चर्चा शक्य, एएसीओत भाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मध्य आशिया भागात भारताचा दबदबा आता वाढत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या दौऱ्यात याचे प्रत्यंतर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याला शनिवारी प्रारंभ झाला आहे. ते प्रथम उझबेकिस्तान आणि नंतर किर्गिस्तानला भेट देणार आहेत. किर्गिस्तानची राजधानी बिष्केक येथे शांघाय सहयोग संघटननेची (एससीओ) बैठक होणार आहे. त्या ते सहभागी होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती मिर्झीयोयेव्ह यांच्या निमंत्रणावरुन त्या देशाचा दौरा करीत आहेत. चार वर्षांच्या नंतर प्रथमच त्यांचा मध्य आशियाचा दौरा होत आहे. रविवारी त्यांची उझबेकिस्तानच्या नेत्यांशी द्विपक्षीय संबंध आणि आर्थिक सहकार्य या विषयावर चर्चा होणार आहे. त्यांचा हा उझबेकिस्तानचा चवथा दौऱ्या आहे. भारताशी रणनैतिक संबंध उझबेकिस्तानच्या पुढाकाराने होत आहेत. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान विकास, डिजिटल कनेक्टिव्हिटी, ऊर्जानिर्मिती आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी हा दौरा आहे.
भारत-2047 आणि उझबेकिस्तान-30
2047 पर्यंत विकसीत राष्ट्र होण्याचा निर्धार भारताने व्यक्त केला आहे. तसेच उझबेकिस्तानने 2030 पर्यंत समर्थ होण्याचे ध्येय ठेवले आहेत. दोन्ही देश एकमेकांच्या त्यांच्या निर्धारांच्या पूर्ततेत साहाय्यता करणार आहेत. यासंबंधी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015, 2016 आणि 2022 या वर्षांमध्ये उझबेकिस्तानचा दौरा केलेला आहे. दोन्ही देशांचे परस्पर संबंध आता घनिष्ट झाले आहेत. ते अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे. दुर्मिळ खनिजांसंबंधीही दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची बरीच शक्यता आहे.
भारतज्ञान तज्ञांशीही चर्चा करणार
उझबेकिस्तानच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील भारतज्ञान तज्ञांशीही (इंडॉलॉजिस्टस्), तसेच विचारवंतांशीही चर्चा करणार आहेत. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात अत्यंत पुरातन काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत. या चर्चेत या संबंधांना उजाळा मिळणार आहे. उझबेकिस्तानची राजधानी ताष्कंद येथील ताष्कंद विद्यापीठाच्या एका कार्यक्रमातही पंतप्रधान नरेंद्र मोदी भाग घेतील.
26 वी SCO परिषद
उझबेकिस्तानच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑगस्ट या दिवशी किर्गिस्तान देशात आयोजित होणाऱ्या 26 व्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. हे एससीओ या संघटनेचे 25 वे वर्ष आहे. या शिखर परिषदेत संघटनेच्या गेल्या 25 वर्षांमध्ये झालेल्या प्रगतीचा आणि संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच भविष्यकाळासाठी योजनांची घोषणाही केली जाण्याची शक्यता आहे. या परिषदेत भारताचा भर विभागीय सहकार्य, संघटनेतील सदस्य देशांमधील सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांच्यावर राहणार आहे.
दौऱ्याचे महत्व अनन्यसाधारण
या दौऱ्यात, एससीओ संघटनेच्या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी या दोन्ही नेत्यांशी स्वतंत्ररित्या बोलणी करतील. अमेरिका-इराण संघर्षाचा जगाच्ना ऊर्जापरिस्थितीवर होणारा परिणाम, या विषयावर परिषदेत चर्चा होणार आहे. भारतासाठी ही चर्चा फारच महत्वाची आहे. अमेरिकेने रशिया आणि इराणवर कठोर आर्थिक निर्बंध घातल्याने भारताच्या तेल पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताने पर्यायी ऊर्जापुरवठा सुनिश्चित करण्यासाठी यापूर्वीच पावले उचलली आहेत. भारत सध्या रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल घेत आहे, तर अमेरिकेकडून नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जात आहे.
भारतासाठी महत्वाचा दौरा
ड जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताचा हा दौरा अतिशय महत्वाचा
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा चवथा उझबेकिस्तान दौरा, संबंध सुधारणार
ड एससीओ शिखर परिषदेत जागतिक घडामोडी, संघटनेच्या प्रगतीवर संवाद
ड व्यापार, संरक्षण, ऊर्जासुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा शक्य
Comments are closed.