युवा ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानचा 35 सदस्यीय संघ
सेनेगलमधील डकार येथे 31 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी हिंदुस्थानने 35 सदस्यीय पथक जाहीर केले आहे. माजी गोळाफेकपटू ओम प्रकाश करहाना यांची पथकप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या चमूमध्ये 17 खेळाडू असून त्यात 11 मुली आणि सहा मुलांचा समावेश आहे. हे खेळाडू 11 क्रीडा प्रकारांत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करतील.
टेबल टेनिसपटू सिंड्रेला दास, बॅडमिंटनपटू तन्वी पत्री आणि जलतरणपटू धिनिधी देसिंगू यांच्याकडून पदकांच्या अपेक्षा आहेत. खेळाडूंना मदत करण्यासाठी 12 प्रशिक्षक, चार फिजिओ आणि एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. 13 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 207 देशांतील सुमारे 2700 खेळाडू सहभागी होणार आहेत. हिंदुस्थानचा हा आतापर्यंतचा सर्वांत छोटा युवा ऑलिम्पिक चमू आहे.
Comments are closed.