प्रशांत कोरटकर फरार अन् तिकडं कुटुंबीय म्हणाले, धमक्या मिळाल्या, पण पोलीस तक्रारीत उल्लेखच नाही
Indrajit Sawant Threat Call Case नागपूर : कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत (Indrajeet Sawant) यांना दिलेली धमकी, तसेच महापुरुषांच्या अवमान प्रकरणी आज (1 मार्च) प्रशांत कोरटकरच्या (प्रशांत कोराटकर) कुटुंबीयांनी बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांची भेट घेतली होती. सुमारे दीड तास प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी आणि काही नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांशी भेटले होते.
दरम्यान, प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीने यानंतर प्रसार माध्यमाशी बोलणं टाळलं होतं. मात्र, मिळालेल्या माहितीप्रमाणे कोरटकर यांच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणामुळे धमक्या मिळत असल्याचे, तसेच कुटुंबाची बदनामी होत असल्याचे त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. मात्र, त्यांनी कुटुंबाला मिळत असलेल्या धमक्यांबद्दल कुठल्याही व्यक्ती किंवा संघटनेचा उल्लेख आपल्या तक्रारीत केलेला नाही. परिणामी पोलिसांनी त्यांची तक्रार स्वीकारली असली तरी त्या संदर्भात कुठलाही गुन्हा नोंदवलेला नसल्याची माहिती आता पुढे आली आहे.
प्रशांत कोरटकरांच्या विरोधात जालन्यातील कदिम पोलीस ठाण्यात गुन्हा
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल वरून धमकी दिल्याप्रकरणी आरोपी प्रशांत कोरटकर विरोधात जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील कदिम पोलीस ठाण्यात शिवप्रेमी आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलेल्या तक्रारी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देताना आरोपीने महापुरुषांच्या बाबत वक्तव करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, महापुरुषांना शिवीगाळ करून सदर आरोपीने सामाजिक जातीय आणि धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी या तक्रारी वरून आरोपी कोरटकर विरोधात धार्मिक आणि जातीय द्वेष पसरून तेढ निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
प्रशांत कोरटकरला शोधावं आणि कठोर कारवाई करावी- मुधोजीराजे भोसले
महापुरुषांच्या अवमान प्रकरणी फरार असलेला आरोपी प्रशांत कोरटकर इंदूरमध्ये लपला होता. त्यानंतर तो मध्यप्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये अज्ञात स्थळी लपून बसल्याचा आणि काही लोक त्याला मदत करत असल्याचा गंभीर आरोप नागपूरकर भोसले राजघराण्याचे मुधोजीराजे भोसले यांनी केला आहे. आधीच प्रशांत कोरटकरला अटक करण्यात उशीर झालाय, त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करून प्रशांत कोरटकरला शोधावं आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुधोजीराजे भोसले यांनी केली आहे. आज (1 मार्च 2025) नागपुरात शिवप्रेमी कार्यकर्ते व मराठा समाजाकडून प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीचे नेतृत्व मुधोजीराजे भोसले यांनी केलं. यावेळी एबीपी माझाने जेव्हा मुधोजीराजे यांना प्रशांत कोरटकरच्या अटकेला उशीर होत आहे का? असं प्रश्न विचारला, तेव्हा काही लोक त्याला मदत करत असून तो इंदूर आणि त्यानंतर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील लपून बसल्याचा आरोप मुधोजीराजे यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.