IPL 2026 – CSK चा झिंगाट परफॉर्मन्स; बहुप्रतीक्षित सामन्यात हार्दिकच्या मुंबई इंडियन्सचा फ्युज उडवला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 च्या 33 व्या सामन्यात संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली आणि त्याने 54 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 6 षटकार ठोकत 101 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या विस्फोटक खेळीमुळे चेन्नईने मुंबईला जिंकण्यासाठी 208 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात मुंबईचे सलामीवीर हजेरी लावून माघारी परतले. मुकेश चौधरी आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या अकिल होसेनने मुंबईची झोप उडवली. दोघांनी मिळून मुंबईला 11 धावसंख्येवर तीन मोठे हादरे दिले. त्यानंतर मुंबईची गाडी जी रुळावरून घसरली ती पुन्हा ट्रॅकवर आली नाही. सूर्यकुमार यादव (36) आणि तिलक वर्मा (37) यांनी डाव सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. कर्णधार पंड्याने एक धावाची सलामी दिली आणि एक एक करत मुंबईचे खेळाडू तंबूत परतत गेले. मुंबईचा संपूर्ण संघ 104 धावांवर बाद झाला.  होसेनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर नुर अहमदने 2 आणि मुकेश, अंशुल, जेमी ओव्हरटन, गुरजपनीत सिंग यांनी प्रय्तेकी 1-1 विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला आणि चन्नईने 103 धावांनी मुंबईचा धुव्वा उडवला.

Comments are closed.