RCB vs DC: आयपीएलमधील पावरप्लेची सर्वात नीचांकी धावसंख्या; दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर लाजीरवाणा विक्रम!
आयपीएल 2026 चा 39 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीच्या नावावर आता आयपीएल इतिहासातील पावरप्लेमधील सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम नोंदवला गेला आहे. सुरुवातीच्या 6 षटकांत (पावरप्ले) दिल्लीचा संघ 6 गडी गमावून केवळ 13 धावा करू शकला.
पावरप्लेमधील आतापर्यंतचे सर्वात निचांकी स्कोअर
यापूर्वी आयपीएलमध्ये पावरप्लेमधील सर्वात कमी धावसंख्या 14 होती. आता दिल्ली 13 धावांसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आली आहे.
दिल्ली कॅपिटल्स 13/6 आरसीबी 2026
राजस्थान रॉयल्स 14/2 RCB 2009
सनरायझर्स हैदराबाद 14/3 राजस्थान रॉयल्स 2022
चेन्नई सुपर किंग्स 15/2 KKR 2011
चेन्नई सुपर किंग्स 16/1 दिल्ली कॅपिटल्स 2015
दिल्लीच्या फलंदाजीची सुरुवात अतिशय खराब झाली एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या साहिलला भुवनेश्वर कुमारने शून्यावर बाद करून दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर लगेच जोश हेझलवूडने राहुलला अवघ्या 1 धावेवर बाद केले. हेझलवूडने रिझवीला ‘गोल्डन डक’ (पहिल्याच चेंडूवर शून्य) वर माघारी धाडले. भुवनेश्वर कुमारने 5 धावांवर खेळत असलेल्या स्टब्सला बाद करून दिल्लीचे कंबरडे मोडले.
कर्णधार अक्षर पटेलला (Axar Patel) भोपळाही फोडता आला नाही, तो शून्यावर बाद झाला. तसेच नितीश राणा 9 चेंडूंत केवळ 1 धाव काढून बाद झाला. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले.
Comments are closed.