2 बीमर टाकल्यानंतरही कार्तिक त्यागीला गोलंदाजीची परवानगी कशी मिळाली? जाणून घ्या आयपीएल नियम

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात एक अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. सुपर ओव्हरमध्ये कोलकात्याच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला. या सामन्यात कोलकात्याचा स्टार वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी याच्याबाबत एक प्रश्न उपस्थित केला जात आहे.

​लखनऊच्या संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी ७ धावांची गरज होती आणि चेंडू कार्तिक त्यागीच्या हातात होता. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कार्तिकने कंबरेच्या वर (वेस्ट हाईट) चेंडू टाकला, ज्यामुळे पंचांनी तो ‘नो बॉल’ घोषित केला. त्यानंतर पुढचा चेंडूही त्याने तसाच टाकला आणि तो देखील ‘नो बॉल’ ठरवण्यात आला.

​सलग दोन बीमर टाकल्यानंतर आता कार्तिकला गोलंदाजी करण्यापासून रोखले जाईल, असे सर्वांना वाटत होते; पण तसे झाले नाही. या गोष्टीचा निर्णय पूर्णपणे पंचांच्या हातात असतो. जर पंचांना वाटले की तो चेंडू फलंदाजासाठी धोकादायक होता, तरच ते गोलंदाजाला गोलंदाजी करण्यापासून रोखू शकतात

Comments are closed.