मैदानात पुन्हा तोच जुना ‘स्विंगचा सुलतान’…; 36व्या वर्षी भुवीचा दिल्लीला दणका; टीम इंडियाचे द
भुवनेश्वर कुमार डीसी विरुद्ध आरसीबी आयपीएल 2026 : आयपीएल 2026 च्या 39 व्या सामन्यात आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आरसीबीच्या गोलंदाजांनी पहिल्याच षटकात योग्य ठरवला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने आजच्या सामन्यात युवा खेळाडू साहिल पारखला पदार्पणाची संधी दिली होती. मात्र, पारखसाठी हे पदार्पण एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरले. आरसीबीचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत डावाच्या सुरुवातीलाच दिल्लीला मोठा धक्का दिला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याने केलेल्या भेदक माऱ्याने सर्वांची मने जिंकली आहेत. काही दिवासाआधी त्याच्या या कामगिरीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने ‘भुवी’च्या टीम इंडियातील पुनरागमनासाठी वकिली केली होती आहे.
भुवनेश्वरचा तो ‘मॅजिकल’ चेंडू
षटकातील दुसऱ्याच चेंडूवर भुवनेश्वरने साहिल पारखचा त्रिफळा उडवला. भुवनेश्वरचा हा चेंडू मिडल स्टंपच्या रोखाने वेगाने आत आला. चेंडू इतका अचूक आणि वेगवान होता की पारखला तो समजण्यापूर्वीच मधली यष्टी हवेत उडाली. ‘स्विंग किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुवनेश्वरने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले. पारखने बचावाचा प्रयत्न केला खरा, पण चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडच्या मधून वेगाने यष्टीवर आदळला. पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाल्याने साहिल पारखला निराश होऊन तंबूत परतावे लागले.
𝙎𝙬𝙞𝙣𝙜 ती भुवी सारखी 🤌
विंटेज भुवनेश्वर कुमार त्याच्या सर्वोत्तम ❤️
अपडेट्स ▶️ https://t.co/HIiNNEutP0#TATAIPL | #खेलबिंदास | #DCvRCB | @RCBTweets pic.twitter.com/esscp0jTec
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 27 एप्रिल 2026
मोहम्मद कैफ झाला होता भावुक
भुवनेश्वरची कामगिरी पाहून मोहम्मद कैफने ‘X’ (ट्विटर) वर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. कैफ म्हणाला की, “भुवनेश्वर आजही तशीच गोलंदाजी करत आहे जशी तो वयाच्या 17 व्या वर्षी करायचा. जेव्हा मी उत्तर प्रदेशचा कर्णधार होतो, तेव्हा त्याच्यातील प्रतिभा ओळखून मी त्याला निवडण्याचा आग्रह धरला होता. त्याने रणजी पदार्पणात सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद करून इतिहास रचला होता. आज 36व्या वर्षीही त्याची स्विंग तशीच आहे. टीम इंडियात त्याचे पुनरागमन का होऊ शकत नाही? त्याच्यात अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे.”
भुवनेश्वर कुमार भारतासाठी आपला शेवटचा सामना नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र, आयपीएल 2026 मधील सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे त्याने पुन्हा एकदा निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग-11 : साहिल पारख, केएल राहुल, नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्ंधर), दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, टी नटराजन, काइल जेमसन.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग-11 : विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, सुयश शर्मा, रसिक दार.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.