IPL 2026 – एलनचा रौद्र अवतार! कोलकाताचा दिल्लीवर 8 विकेट्सनी धडाकेबाज विजय
कोलकाता नाइट राइडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर 8 विकेट्सने दमदार विजय मिळवत प्लेऑफच्या आशा त्यांनी जिवंत ठेवल्या आहेत. IPL 2026 च्या या हंगामातील हा कोलकाताचा सलग चौथा विजय ठरला असून 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने अवघ्या 34 चेंडू बाकी ठेवून सामना जिंकला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या फिन एलनने 47 चेंडूत नाबाद 100 धावांची तुफानी खेळी करत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.
एलनने 5 चौकार आणि 10 षटकारांच्या जोरावर 80 धावा फक्त बाउंड्रीतून काढल्या आणि केकेआरसाठी सर्वात जलद शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी ब्रेंडन मॅक्कुलम, वेंकटेश अय्यर आणि सुनील नरेन यांनीच कोलकातासाठी शतक झळकावले होते. दिल्लीकडून पथुम निसांका (50) आणि आशुतोष शर्मा (39) यांनी धावा केल्या.
Comments are closed.