IPL 2026 – आयपीएलमध्ये नव्या सम्राटाची चाहूल, पठाणचे मत पंजाबला तर रैना आरसीबीच्या पाठीशी
आयपीएलच्या प्ले ऑफची शर्यत आता चांगलीच तापली आहे. 10 सामन्यांत 14 गुणांसह हैदराबाद अव्वल स्थानी पोहोचलाय, तर पंजाब 13 गुणांसह त्याच्या मागे आहे. गतविजेता आरसीबीही 12 गुणांसह शर्यतीत आहे. मात्र माजी हिंदुस्थानी कसोटीपटू इरफान पठाणला यंदा नव्या विजेत्याची चाहूल लागलीय. त्याच्या मते पंजाबचा खेळ आक्रमक आणि संतुलित आहे. कूपर कोनोली गोलंदाजीत रंगला तर पंजाबला रोखणे कठीण जाईल
पठाणने दिल्ली कॅपिटल्सलाही स्पर्धेबाहेर मानलेले नाही. गुजरातविरुद्धचा निसटता पराभव दिल्लीला महागात पडल्याचे त्याने म्हटले. पण पंजाबच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर सलग झालेल्या तीन पराभवांनंतर पठाणचे मत कायम असले तरी अन्य संघांच्या मतांमध्ये फरक पडू लागलाय. दुसरीकडे माजी हिंदुस्थानी कसोटीपटू सुरेश रैनाला आरसीबी पुन्हा किताब जिंकताना दिसतोय. ‘रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीची गोलंदाजी आणि संघभावना जबरदस्त दिसतेय, असे तो म्हणाला.
रैनाने राजस्थान रॉयल्सच्या युवा तुकडीचेही जोरदार काwतुक केले. वैभव सूर्यवंशीची निर्भीड फलंदाजी, जोफ्रा आर्चरची आग आणि रियान परागचे नेतृत्व राजस्थानला धोकादायक बनवत असल्याचे त्याने सांगितले. शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सलाही त्याने प्रबळ दावेदार मानले, पण अखेरचा शब्द मात्र आरसीबीचाच असेल, असा दावा केला.
Comments are closed.