IPL 2026 – डोळे वटारले, टाळ्या वाजवल्या… वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतरचं सेलिब्रेशन भोवलं, जेमीसनवर कारवाई
इंडियन प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना पार पडला. 450 हून अधिक धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात दिल्लीने राजस्थानचा पराभव केला. या लढतीत दिल्लीचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसन याने 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याला बाद केल्यानंतर केलेले आक्रमक सेलीब्रेशन चर्चेचा विषय ठरले होते. आता हेच आक्रमक सेलीब्रेशन त्याला महागात पडले असून आयपीएलच्या आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
शुक्रवारी जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर आयपीएलच्या 19व्या हंगामातील 43वा सामना खेळला गेला. राजस्थानच्या डावातील दुसऱ्या षटकात जेमीसनने आक्रमक युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला बोल्ड केले. विकेट घेतल्याचा आनंद साजरा करताना जेमीसन वैभवच्या जवळ गेला आणि त्याने डोळे वटारून, टाळ्या वाजवत आक्रमक सेलीब्रेशन केले. त्याचे हे वागणे फलंदाजाला चिथावणी देणारे असल्याचे मानले गेले आहे.
दरम्यान, आयपीएलकडून जेमीसनवर कडक कारवाई करण्यात आली आहे. जेमीसनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केले आहे. हे कलम खेळाडूंना चिथावणी देण्याशी संबंधित आहे. जेमीसनने आपली चूक कबूल केली असून मॅच रेफरी राजीव सेठ यांनी सुनावलेली शिक्षा मान्य केली आहे. जेमीसनच्या खात्यात आता एक डिमेरिट पॉईंट जमा झाला आहे.
एक इन-स्विंगिंग यॉर्कर 😲🔥
🎥 काइल जेमिसनला वैभव सूर्यवंशी लवकर मिळाला 👊
उत्सवाची प्रतीक्षा करा 👀
अपडेट्स ▶️ https://t.co/6OOjzHtZiD#TATAIPL | #खेळबिंदास | #RRvDC | @DelhiCapitals pic.twitter.com/6vxJ5ahlb3
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 1 मे 2026
Comments are closed.