विराट कोहली शिव्या देतो, हातवारे करतो, तेव्हा कुठे जातो नियम?, जेमिसनवर कारवाईनंतर BCCIवर दुजाभ
बीसीसीआयने काइल जेमिसनला शिक्षा केली बातमी : आयपीएल 2026 चा थरार सध्या शिगेला पोहोचला आहे, मात्र शुक्रवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात एका वेगळ्याच कारणामुळे वादाला तोंड फुटले. राजस्थानचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीची विकेट घेतल्यानंतर आक्रमक जल्लोष करणाऱ्या दिल्लीच्या काईल जेमिसनवर बीसीसीआयने (BCCI) दंडात्मक कारवाई केली आहे. मैदानातील खेळाडूंच्या वर्तणुकीवरून आता सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले असून विराटला एक न्याय आणि जेमिसनला दुसरा का? असा सवाल क्रिकेट चाहते विचारत आहेत.
नेमकं काय घडलं?
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या वैभव सूर्यवंशीने जेमिसनला एक चौकार मारला. मात्र, पुढच्याच चेंडूवर जेमिसनने एक यॉर्कर टाकत वैभवचा त्रिफळा उडवला. अवघ्या 4 धावांवर वैभव बाद झाला खरा, पण जेमिसनने केलेल्या जल्लोषाने सर्वांचे लक्ष वेधले.
विकेट घेतल्यानंतर जेमिसन जोराने ओरडत वैभवच्या दिशेने गेला आणि त्याच्या अगदी जवळ जाऊन टाळ्या वाजवू लागला. 15 वर्षांच्या वैभवला अशा प्रकारे डिवचणे बीसीसीआयला नियमांचे उल्लंघन वाटले आणि त्यांनी तातडीने जेमिसनला शिक्षा सुनावली.
एक इन-स्विंगिंग यॉर्कर 😲🔥
🎥 काइल जेमिसनला वैभव सूर्यवंशी लवकर मिळाला 👊
उत्सवाची प्रतीक्षा करा 👀
अपडेट्स ▶️ https://t.co/6OOjzHtZiD#TATAIPL | #खेळबिंदास | #RRvDC | @DelhiCapitals pic.twitter.com/6vxJ5ahlb3
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 1 मे 2026
विराट कोहलीशी तुलना अन् दुजाभावाचे आरोप
जेमिसनवर कारवाई झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. अनेक चाहत्यांनी आणि विश्लेषकांनी बीसीसीआयच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चाहत्यांच्या मते, विराट कोहलीचे मैदानातील सेलिब्रेशन हे यापेक्षा कितीतरी पटीने आक्रमक असते. नुकतेच विराट कोहलीचे केएल राहुल आणि शुभमन गिल यांच्यासोबतचे मैदानातील वर्तन चर्चेचा विषय ठरले होते, मात्र त्यावर कोणतीही कठोर कारवाई झाली नाही. चाहत्यांचा प्रश्न आहे की, जर मोठे खेळाडू आक्रमकता दाखवू शकतात, तर जेमिसनलाच का टार्गेट केले गेले? केवळ फलंदाज लहान वयाचा आहे म्हणून नियम बदलतात का?
विंटेज #विराटकोहली ऊर्जा 🔥
किंग पकडतो, प्रिन्स निघतो – संपूर्ण सिनेमा! 🙌 🎯#TATAIPL 2026 ➡️ #GTvRCB | आता थेट 👉https://t.co/K8vuSzrZ1d pic.twitter.com/jCKi1Qo4zA
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 30 एप्रिल 2026
आयपीएलने पोस्ट करत काय म्हटलं?
आयपीएलने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, “जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या 43 व्या सामन्यादरम्यान खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी असलेल्या आयपीएल आचारसंहितेच्या स्तर 1 चे उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज काईल जेमिसनला एक डिमेरिट पॉइंट आणि एक चेतावणी देण्यात आली आहे.”
“ही घटना पहिल्या डावाच्या दुसऱ्या षटकात घडली, जेव्हा वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर, जेमिसन त्याच्याकडे आक्रमकपणे जात असल्याचे आढळले, ज्यामुळे फलंदाजाकडून आक्रमक प्रतिक्रिया येऊ शकली असती. जेमिसनने आपली चूक कबूल केली आणि सामनाधिकाऱ्याने दिलेली शिक्षा स्वीकारली.”
दिल्ली कॅपिटल्सने मोठा विजय
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक रियान परागच्या बाजूने झाली. आरआरच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, राजस्थानने 6 गडी गमावून 225 धावा केल्या. मात्र, दिल्लीने 3 गडी राखून आणि 5 चेंडू शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग पूर्ण केला आणि 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे दिल्ली गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचली आहे.
हे ही वाचा –
MS Dhoni CSK vs MI IPL 2026 : MS धोनीच्या फिटनेसबद्दल मोठी बातमी! मुंबईविरुद्ध मैदानात उतरणार? जाणून घ्या अपडेट
आणखी वाचा
Comments are closed.