IPL 2026 – लखनौका बुडाली… प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा लखनौ पहिलाच संघ
चेपॉकवर चौकार–षटकारांची आतषबाजी४०० हून अधिक धावांचा पाऊस आणि शेवटी लखनौ सुपर जायंट्सची 'लाख'नौका' अक्षरशः बुडाल्याचे चित्र. उर्विल पटेलच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने लाखनौचा ५ विकेट आणि 4 चेंडू राखून धुव्वा उडवला. या पराभवासह सलग तिसऱ्यांदा पुष्पहार पत्करणाऱ्या लखनौचे आयपीएलमधील खेळा ऑफचे स्वप्न अधिकृतरीत्या भंगले. विशिष्ट म्हणजे, यंदाच्या हंगामातून बाहेर पडणारा लखनौ हा पहिलाच संघ ठरला.
उर्विलची चेपॉकवर सिक्सर–सुनामी
204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सुरुवातीपासूनच लखनौच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी केवळ 22 चेंडूंत 45 धावांची स्पह्टक सलामी दिली. संजूने 14 चेंडूंत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 28 धावा चोपल्या. मात्र खरी फटकेबाजी केली ती उर्विल पटेलने. लखनौचे गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि रणनीती सर्व काही त्याच्या फटक्यांपुढे निप्रभ ठरले. उर्विलने अवघ्या 13 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत यशस्वी जैसवालच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याने पहिल्या चेंडूवर एकेरी धाव काढल्यानंतर पुढील सात चेंडूंवर 6, 6, 6, 6, 6, 4, 6 असे फटके मारून आठ चेंडूंत 41 धावा ठोकल्या होत्या. तेव्हा त्याला विश्वविक्रम रचण्याची संधी होती, पण त्याने 9 धावा करायला पाच चेंडू घेतले आणि 13 व्या चेंडूवर पन्नाशी साजरी केली. त्याने 23 चेंडूंच्या खेळीत 8 षटकार खेचत 65 धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा लखनौच्या हातून सामना निसटला होता.
दुबे–वीरचाही हल्ला
उर्विलनंतर ऋतुराज गायकवाडनेही 28 चेंडूंतील 42 धावांची संयमी पण आक्रमक खेळी केली. डेवाल्ड ब्रेव्हिस आणि कार्तिक शर्मा झटपट बाद झाल्याने लखनौला पुनरागमनाची आशा निर्माण झाली होती. पण शुभम दुबे (15) आणि प्रशांत वीर (17) यांनी अखेरच्या षटकांत जोरदार फटकेबाजी करत लखनौच्या आशांवर शेवटचा घाव घालत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी लखनौने 8 बाद 203 धावांची मजबूत मजल मारली होती. सुरुवातीलाच मिचेल मार्श, निकोलस पूरन, एडन मारक्रम स्वस्तात परतले. तेव्हा इम्पॅक्ट खेळाडू जोश इंग्लिसने एकहाती लढा देत33 चेंडूंत 10 चौकार आणि 6 षटकारांसह 85 धावा ठोकल्या.
Comments are closed.