IPL 2026 पॉइंट्स टेबलमध्ये उलथापालथ! बाहेर जाईल असं वाटणारी टीम झाली नंबर-1, आज RCBकडे मोठी संध

GT vs SRH अपडेट केल्यानंतर IPL 2026 पॉइंट टेबल : आयपीएल 2026 मध्ये सध्या जबरदस्त थरार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडलेली टीम आता भन्नाट कमबॅक करत थेट गुणतालिकेच्या अव्वल स्थानावर पोहोचली आहे. त्यामुळे टॉप-4 चं गणित पूर्णपणे बदललं असून अनेक संघांचं टेन्शन वाढलं आहे. अजूनही प्लेऑफमध्ये कोणत्या चार संघांना जागा मिळणार, याचा नेमका अंदाज बांधणं कठीण झालं आहे.

गुजरात टायटन्स टेबल टॉपर

गुजरात टायटन्सने मंगळवारी सनरायझर्स हैदराबादचा एकतर्फी पराभव करत मोठी झेप घेतली. या विजयासह गुजरातचे आता 16 गुण झाले असून संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने सलग पाच सामने जिंकत दमदार पुनरागमन केलं आहे. आता एखादा मोठा उलटफेर झाला तरच गुजरात प्लेऑफच्या बाहेर जाईल, अन्यथा त्यांचं स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे.

आरसीबी आणि हैदराबादला धक्का!

गुजरातच्या या विजयाचा सर्वात मोठा फटका आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादला बसला. याआधी अव्वल स्थानी असलेल्या आरसीबीला आता दुसऱ्या क्रमांकावर घसरावं लागलं आहे, तर हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आली आहे. दोन्ही संघांचे 14 गुण असले तरी नेट रनरेटच्या आधारे आरसीबी वरचढ ठरली आहे. पंजाब किंग्स 13 गुणांसह चौथ्या स्थानावर असली तरी सलग चार पराभवांमुळे त्यांच्या प्लेऑफच्या आशांवर संकटाचे ढग दाटले आहेत.

CSK अन् RR शर्यतीत कायम

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघही अजून शर्यतीतून बाहेर गेलेले नाहीत. दोन्ही संघांच्या खात्यात सध्या 12 गुण आहेत. आणखी एक विजय मिळवला तर त्यांचेही 14 गुण होतील आणि ते पुन्हा टॉप-4 मध्ये जोरदार दावेदारी करताना दिसतील. त्यामुळे आगामी सामने अधिकच निर्णायक ठरणार आहेत.

आरसीबीला आज पुन्हा अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी

दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांची अवस्था सर्वात बिकट झाली आहे. दोन्ही संघांच्या खात्यात फक्त 6 गुण असून ते अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. त्यामुळे त्यांचा प्लेऑफचा मार्ग जवळपास बंद झाल्याचं मानलं जात आहे. आता सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याकडे लागल्या आहेत. आरसीबीने विजय मिळवला तर ते पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावू शकतात. मात्र केकेआरचा पराभव झाला तर त्यांचा प्लेऑफचा प्रवास अधिकृतपणे संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा सामना देखील प्रचंड रंगतदार आणि हायव्होल्टेज होणार, यात शंका नाही.

हे ही वाचा –

MS Dhoni IPL 2026 : 2 आठवड्यांत परतेन म्हणणारा धोनी अजूनही बाहेरच; आता लखनऊचं तिकीट बुक, कमबॅकच्या चर्चांनी चाहते भावूक

आणखी वाचा

Comments are closed.