आयपीएल पॉईंट टेबलमध्ये भयंकर ट्विस्ट, लखनऊकडून पराभव स्वीकारत चेन्नई सहाव्या क्रमांकावर घसरली;
आयपीएल 2026 गुण सारणी:आयपीएल २०२६ (IPL 2026) चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रत्येक सामन्यानंतर बाद फेरीची (Play-offs) समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. १५ मे रोजी झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पराभव केला. या निकालानंतर गुणाक्तक्त्यात मोठी उलथापालथ झाली असून गुणतालिकेतील चुरस कमालीची वाढली आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात अव्वल स्थानासाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळत आहे.
आरसीबी आणि गुजरात १६ गुणांसह अव्वल स्थानावर
ताजी आकडेवारी पाहिल्यास, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १२ सामन्यांत १६ गुणांसह आणि उत्तम रन रेटच्या (+१.०५३) जोरावर पहिले स्थान पटकावले आहे. बेंगळुरूचे आगामी सामने पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध होणार आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सनेही १२ सामन्यांत १६ गुण मिळवले आहेत, परंतु कमी नेट रन रेटमुळे (+०.५५१) ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गुजरातला प्ले-ऑफमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचे उर्वरित सामने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.
सनरायझर्स आणि पंजाब किंग्स तिसऱ्या व चौथ्या स्थानावर (IPL 2026)
सनरायझर्स हैदराबादचा (SRH) संघ १२ सामन्यांत १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर मजबूत स्थितीत आहे. हैदराबादचा नेट रन रेट +०.३३१ असून त्यांचे पुढील सामने चेन्नई आणि आरसीबी सारख्या बलाढ्य संघांशी आहेत. दरम्यान, पंजाब किंग्सने (PBKS) १२ सामन्यांत १३ गुणांसह चौथे स्थान मिळवले आहे. पंजाबचा नेट रन रेट +०.३५५ आहे. त्यांना अव्वल ४ मध्ये टिकून राहण्यासाठी आरसीबी आणि लखनऊविरुद्ध विजय मिळवणे बंधनकारक आहे.
मध्य फळीतील संघांची धडपड आणि चेन्नईला फटका (CSK)
राजस्थान रॉयल्सचे (RR) ११ सामन्यांत १२ गुण असून ते पाचव्या स्थानावर आहेत. राजस्थानचे अजून ३ सामने शिल्लक असल्याने त्यांच्याकडे गुणतालिकेत वर जाण्याची चांगली संधी आहे. मात्र, १५ मे रोजी लखनऊविरुद्ध मिळालेल्या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सला (CSK) मोठा फटका बसला आहे. चेन्नई १२ सामन्यांत १२ गुणांसह सहाव्या स्थानावर घसरली आहे. त्यांचा नेट रन रेट केवळ +०.०२७ आहे. चेन्नईला प्ले-ऑफच्या शर्यतीत जिवंत राहण्यासाठी हैदराबाद आणि गुजरातविरुद्धचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.
तळातील संघांचे आव्हान संपुष्टात?
दिल्ली कॅपिटल्स (१० गुण), कोलकाता नाईट रायडर्स (९ गुण), मुंबई इंडियन्स (८ गुण) आणि लखनऊ सुपर जायंट्स (८ गुण) हे संघ अनुक्रमे ७ व्या, ८ व्या, ९ व्या आणि १० व्या क्रमांकावर आहेत. लखनऊने चेन्नईला हरवून आपले ८ गुण केले असले तरी, त्यांचा खराब नेट रन रेट (-०.७०१) पाहता त्यांचे पुढील आवाहन अत्यंत कठीण दिसते. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ या मातब्बर संघांचे यंदाचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.